ठाणे : ठाणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दररोज चढउतार होत असून बुधवारी जिल्ह्यात एक हजार ७९३ नव्या रुग्णांसह २६ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या एक लाख ५१ हजार २३६ झाली तर, मृतांची संख्या आता चार हजार ९ झाली आहे.ठाणे जिल्ह्यातील कल्याण डोंबिवलीत सर्वाधिक ५३७ नव्या रुग्णांसह ५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची एकूण संख्या ३६ हजार ६६८ तर, मृतांची एकूण संख्या ७४४ झाली. मीरा भार्इंदरमध्ये नव्या २०० रुग्णांची तर, बाधितांची एकूण संख्या १५ हजार ७९१ झाली आहे. भिवंडी महापालिका क्षेत्रात नव्या ३५ बाधितांची नोंद झाली. अंबरनाथमध्ये नव्या २२ रुग्णांची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या ५ हजार ६०८ झाली. तर, बदलापूरमध्ये नव्या ८६ रुग्णांची नोंद झाली.
एक लाख नागरिकांची अँटिजेन चाचणीनवी मुंबई : शहरात आतापर्यंत १६६५१६ नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यामध्ये १०१०९० अँटीजेन चाचण्यांचा समावेश आहे.
वसई-विरारमध्ये २१८ रुग्ण मुक्तवसई : वसई-विरार शहरात बुधवारी दिवसभरात वसईतील दोन रुग्णांचा मृत्यू झाला. बाधित रुग्णसंख्या १८२ ने वाढली. तर २१८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.