ठाणे: माध्यमिक व प्राथमिक शाळा 1 जुलै पासून नियमित सुरू करण्याचे शासनाचे आहे आहे. मात्र, लॉक ऑन मुळे कोव्हिड -१९ च्या रुग्णांमध्ये वाढ होऊन महामारी दुप्पटीने पसरत आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षकांच्या मनामध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे 1 जुलैपासून शाळा नियमित करता येणार नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोकण विभाग शिक्षक सेनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी निदर्शनात आणून दिले. यावर काय निर्णय होणार आता त्याकडे शिक्षकांचे लक्ष लागून आहे.
कोरोनाच्या रेड झोनमधील शाळा प्रत्यक्ष सुरू झाल्यास विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या आरोग्यास प्रचंड धोका निर्माण होऊ शकतो. पालक आणि विद्यार्थ्यांची संपर्क साधला असता विद्यार्थी शाळेत यायला तयार नाहीत. पालकसुद्धा मुलांना शाळेत पाठवणार नाही. त्यामुळे १ जुलैपासून प्रत्यक्ष शाळा सुरू करू नये म्हणून मुख्यमंत्र्यांसह शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना निवेदनाद्वारे मागणी केल्याचे म्हात्रे यांनी सांगितले.
जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे शिक्षकांमध्ये भीती पसरली आहे. त्यामुळे कोव्हीड19 च्या कामात कार्यरत असलेल्या शिक्षकांना २४ जून शासन परिपत्रकानुसार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्वरित कार्यमुक्त करणे अपेक्षित आहे. यासाठी ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक मनपा, शिक्षणाधिकार्यांकडे मागणी केल्याचे ही त्यांनी सांगितले.