शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

Coronavirus News: ठाणे शहरात पेस मास्क आणि पेस शिल्डसह पोलीस ठेवणार कडेकोट बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2020 11:38 PM

वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर २ ते १२ जुलैपर्यंत सुरु राहणाऱ्या लॉकडाऊनच्या कडक अंमलबजावणीसाठी पोलीस प्रशासनाने कडेकोट तयारी केली आहे. या काळात विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असून ५५ ठिकाणी नाकाबंदीचे पॉर्इंन्टस बॅरिकेटस् लावून उभारल्याची माहिती ठाणे शहर पोलिसांनी दिली.

ठळक मुद्देठाण्यात ५५ ठिकाणी नाकाबंदी तर दिड हजार पोलिसांचा फौजफाटा तैनातधान्य, भाजीपाल्यासह ३३ प्रकारच्या अत्यावश्यक सेवांना वगळले

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाणे शहरात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर २ ते १२ जुलैपर्यंत सुरु राहणाºया लॉकडाऊनच्या कडक अंमलबजावणीसाठी पोलीस प्रशासनाने कडेकोट तयारी केली आहे. या काळात विनाकारण फिरणाºयांवर कारवाई केली जाणार असून ५५ ठिकाणी नाकाबंदीचे पॉर्इंन्टस बॅरिकेटस् लावून उभारले आहेत. अर्थात, धान्य, भाजीपाल्यासह ३३ प्रकारच्या अत्यावश्यक सेवांना यातून वगळल्यामुळे हा नागरिकांना दिलासा मिळणार आहे.ठाणे शहरासह कल्याण डोंबिवली तसेच संपूर्ण पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रातच २९ जून ते ३१ जुलै २०२० या कालावधीमध्ये पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी मनाई आदेश लागू केला आहे. या आदेशाद्वारे सार्वजनिक कार्यक्रमांच्या आयोजनाबरोबरच खासगी आणि एसटी महामंडळासह सार्वजनिक वाहतूक सेवा बंद राहणार आहे. शैक्षणिक संस्था, धार्मिक स्थळे आणि सायकलसह सर्वच वाहनांना तसेच प्रवासी वाहतूकीला बंदी करण्यात आली आहे.* रात्री ९ ते सकाळी ५ वाजेपर्यंत सार्वजनिक ठिकाणी संचारबंदी राहणार आहे. किमान सहा फूटांचे सामाजिक अंतर आणि मास्क लावणे बंधनकारक राहणार आहे. मॉर्निंगसह इतर फेरफटका पूर्णपणे बंद राहणार आहे.* यासाठी आदेश लागू नाही : अंत्यविधी आणि लग्नसमारंभ (५० व्यक्ती), दूध, दुग्धोत्पादने, फळे आणि भाजीपाला, जीवनावश्यक वस्तू, वैद्यकीय उपकरणे, बँकीग सेवा अशा ३५ प्रकारच्या अत्यावश्यक सेवांना यातून वगळण्यात आले आहे.* दरम्यान, ठाणे महापालिका क्षेत्रात लागू केलेल्या लॉकडाऊनच्या अंबलबजावणीसाठी शहरातील प्रमुख रस्त्यांवर बॅरिकेटस् लावण्यात आल्या आहेत. राज्य राखीव दलासह सुमारे दीड हजार पोलिसांची कुमक तैनात केली आहे.ठाण्यासह कल्याण, डोंबिवलीतीलही प्रमुख मार्गासह सर्व रस्त्यांच्या एण्ट्री पॉईंटवर बांबू, बॅरीकेडस लावून नाकाबंदी केली आहे. नियम मोडणाºयांना दंड आणि प्रसंगी पोलीसी खाक्याही दाखवला जाणार आहे. त्यासोबत खटलेही दाखल केले जाणार असल्यामुळे नागरिकांनी घरात सुरक्षित रहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.ठाणे आणि कल्याण- डोंबिवली महापालिका क्षेत्रामध्ये २ जुलै रोजी सकाळी ७ वाजल्यापासून कडकडीत लॉकडाऊन जारी केले आहे. या काळात दुकाने, व्यवहार बंद राहणार असून अंतर्गत वाहतुकीवरही निर्बंध राहणार आहे. लॉकडाऊन 1 पेक्षाही अनलॉनंतर जारी केलेला हा लॉकडाऊन कडक असणार आहे. पोलिसांनीही त्यासाठी जोरदार व्यूहरचना केली आहे.* ठाणे आणि वागळे इस्टेट या दोन्ही परिमंडळांमध्ये ५५ ठिकाणी नाकाबंदी आहे. राज्य राखीव दलासह दीड ते दोन हजार पोलिसांचा ताफा आहे.* तर कल्याण, डोंबिवलीतील ६१ निवासी भाग सील केले असून नाकाबंदी कडक केली आहे. पेट्रोलिंगसाठी ७५० पोलिसांची कुमक तैनात केली आहे.* असे आहे पोलिसांचे सुरक्षाकवचआधीच्या लॉकडाऊनच्या काळात ठाण्यातील सुमारे ५०० पेक्षा अधिक कोरोनामुळे बाधित झाले. त्यामुळे आता सुरक्षाकवचासह पोलिसांना फिल्डवर उतरविण्यात आले आहे.पेस मास्क, पेस शिल्ड, हॅण्डग्लोज, सॅनिटायझरचा मुबलक पुरवठा केला असून सोशल डिस्टसिंग राखूनच कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिले आहेत.

टॅग्स :thaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस