शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

CoronaVirus News: रुग्णांना १६ लाख रुपये केले परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 1:22 AM

कोविड रुग्णांची लूट १५ रुग्णालयांना बजावल्या नोटिसा

कल्याण : कोरोना रुग्णांकडून सरकारने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जादा रकमेची बिले आकारणाऱ्या १५ रुग्णालयांना केडीएमसी प्रशासनाने नोटिसा पाठविल्या आहेत. या रुग्णालयांनी उपचारापोटी एकूण ३१ लाख ४५ हजार रुपये जास्तीचे आकारले आहे. त्यापैकी १६ लाख १५ हजार रुपये वसूल करून संबंधित रुग्णांना पालिकेने परत केले आहेत.महापालिकेने प्रत्येक रुग्णालयात एक कर्मचारी नेमला होता. त्याने शहानिशा केल्यावर रुग्णालयाने बिल स्वीकारावे, असे आदेश मनपाने दिले होते. तरीहीही काही रुग्णालये रुग्णांची लूट करीत होते.मनपाचे मुख्य लेखा अधिकारी सत्यवान उबाळे यांच्या नियंत्रणाखाली भरारी पथकाचे अधिकारी विनय कुलकर्णी यांनी तपासणी केली असता १५ रुग्णालयांकडून जादा बिल आकारल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे मनपाने त्यांना नोटिसा पाठविल्या. ३१ लाख ४५ रुपये रक्कम आक्षेपार्ह आढळून आली. त्यापैकी १६ लाख १५ हजार रुपये वसूल करून संबंधित रुग्णांना परत देण्यात आले आहेत. उर्वरित १५ लाख तीन हजार रुपयेदेखील वसूल केले जातील.श्रीदेवी रुग्णालयास विचारला जाबकल्याणमधील श्रीदेवी रुग्णालयाने एका रुग्णाच्या बिलात कोविड कचºयाचेही बिल लावले होते. याप्रकरणी शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांनी आयुक्तांकडे तक्रार केली होती. आयुक्तांनी याप्रकरणी रुग्णालयास नोटीस पाठवली आहे. महापालिकेच्या दफ्तरी रुग्णालयाचा असलेला परवाना रद्द का करण्यात येऊ नये, अशी विचारणा यात केली आहे.