मुरबाड : कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी सरकारी यंत्रणा ही विविध उपाययोजना करत असताना, मुरबाडमधील शासकीय विश्रामगृहात कोरोनाचे लसीकरण सुरू असून, त्याच ठिकाणी कल्याण प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचा कॅम्प असल्याने लसीकरण की आरटीओचे कामकाज सुरू आहे हेच कळेनासे झाले आहे. गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. अशामुळेच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.तालुक्याचा बहुतांश भाग हा ग्रामीण असल्याने कोविडचे प्रमाणही कमी आढळते. भविष्यात कोविडचे सावट येऊ नये म्हणून नागरिक कोरोनाची प्रतिबंधात्मक लस घेण्यास स्वत:हून पुढे येत आहेत. परंतु कोरोनाचे प्रमाण हे शहरी भागात मोठ्या प्रमाणात असल्याने कल्याण- डोंबिवली, ठाणे, मुंबई येथील एखादा प्रवासी आपल्याशेजारी आला, तरी नागरिकांमध्ये घबराट होते. त्यासाठी ग्रामीण भागातील नागरिक हे सुरक्षितता बाळगतात.कल्याणमध्ये कोरोनाचे रुग्ण अधिक आढळूनही तेथील प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी हे शहरी भागात कॅम्प आयोजित करण्यासाठी स्थानिक यंत्रणेकडून परवानगी मिळत नसल्यामुळे ते आपला आर्थिक फायदा होण्यासाठी मुरबाडसारख्या ग्रामीण भागात आपले कॅम्प आयोजित करून नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे.इतर नागरिकांना प्रतिबंधमुरबाड येथील शिवनेरी विश्रामगृहात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू असून, त्या ठिकाणी इतर नागरिकांना प्रतिबंध करण्यात आला आहे. त्याठिकाणी कोणतेही शिबिर किंवा इतर कार्यक्रम घेऊ नये, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या असतानाही ते या गंभीर बाबींकडे दुर्लक्ष करीत आहेत. - डॉ. श्रीधर बनसोडे, तालुका आरोग्य अधिकारी
CoronaVirus News: लसीकरणाच्या ठिकाणीच आरटीओचे शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2021 12:55 AM