शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : आज मतदार सत्ताधारी, राज्यात ४ हजार १३६ उमेदवारांचे भवितव्य ‘ईव्हीएम’मध्ये बंद होणार!
2
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
3
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
4
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
6
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
7
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
8
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
9
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
10
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
11
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
12
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
13
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
14
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
15
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
16
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
17
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
18
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
19
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
20
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल

CoronaVirus News : भिवंडीत मजुरांसाठी यंत्रमाग व्यावसायिकांची धडपड 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2020 5:51 PM

मागील चार ते पाच महिन्यांपासून बंद असलेल्या या बंदमुळे यंत्रमाग व्यावसायिक प्रचंड आर्थिक कचाट्यात सापडले आहे.

नितिन पंडीत 

भिवंडी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर शासनाद्वारे करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फटका शहरातील यंत्रमाग व्यवसायाला चांगलाच बसला आहे. सध्या देशासह राज्यभर अनलॉक करण्यात आला असला तरी लॉकडाऊनच्या काळात झालेल्या परप्रांतीय मजुरांच्या स्थलांतरामुळे शहरातील यंत्रमाग व्यवसाय सुरु करण्यासाठी अपुऱ्या मजुरांअभावी यंत्रमाग व्यावसायिकांना अनेक अडचणी येत आहेत. त्यातच लॉकडाऊन व मजुरांच्या स्थलांतरामुळे यंत्रमाग व्यवसाय पुरता डबघाईला गेला आहे.  मागील चार ते पाच महिन्यांपासून बंद असलेल्या या बंदमुळे यंत्रमाग व्यावसायिक प्रचंड आर्थिक कचाट्यात सापडले आहे. शहरात हळूहळू यंत्रमाग व्यवसाय सुरु झाला आहे. मात्र त्यातही मजुरांचा तुटवडा असल्याने मजूर मिळविण्यासाठी यंत्रमाग व्यावसायिकांची धडपड वाढली आहे.

लॉकडाऊनमुळे बंद झालेले यंत्रमाग सध्या सुरू होत असल्याने कापड मालाची मागणी वाढली आहे मात्र मजुरांच्या स्थलांतरामुळे सध्या व्यवसायिकांसमोर मजुरांचा मोठा तुटवडा भासत आहे. अनेक यंत्रमाग व्यावसायिक आपल्या कारखान्यातील स्थलांतरित झालेल्या मजुरांची मनधरणी करत आहेत तर काही व्यावसायिक काजूरांना आगाऊ पैसे व भाड्यासाठी तिकीट बुक करून देत आहेत. मात्र लॉकडाऊन व अनलॉक कालावधीत स्थलांतरित मजुरांनी आपल्या गावी जाऊन शेतीकडे लक्ष दिले असल्याने आजही शहरात मजूर यायला तयार नसल्याने यंत्रमाग व्यवसायिकांसमोर मजूर पुरवठ्याचे नवे आव्हान समोर आले आहे.        

कापड उद्योगाचे मँचेस्टर त्याच बरोबर कापड उद्योगाचे माहेरघर म्हणून भिवंडी शहर देशभर प्रसिद्ध आहे. कापडाची निर्मिती व व्यापार मोठ्या प्रमाणत असल्याने भिवंडीत यंत्रमाग व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढला होता. एकेकाळी देश विदेशातील मोठ मोठ्या बाजारपेठांवर अधिराज्य गाजविलेला भिवंडीतील यंत्रमाग व्यवसाय मात्र लॉकडाऊनमुळे पुरता डबघाईला आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने अनलॉक काळात यंत्रमाग व्यवसाय सुरु करण्यासाठी परवानगी दिली आहे मात्र यंत्रमाग मजूर परप्रांतातील आपल्या मुळगावी गेल्याने सध्या मजुरांअभावी येथील यंत्रमाग व्यवसाय मोठ्या प्रमाणात अडचणीत आला आहे. एकीकडे अनेक दिवसांपासून बंद असलेला यंत्रमाग व्यवसाय सुरु झाल्याने व्यावसायिकांकडे मालाची मागणी वाढली आहे मात्र मजूरपुरवठा कमी असल्याने जादा उत्पादनात अडचणी येत आहेत.    

सध्या शहरात 70 ते 80 टक्के यंत्रमाग व्यवसाय दोन शिफ्टमध्ये सुरू झाला आहे मात्र दहा बारा दिवसांपूर्वी मजुरांचा अभाव शहरात जास्त होता आता हळूहळू गावी गेलेलले मजूर परतत असल्याने सध्या यंत्रमाग व्यवसाय पूर्वपदावर येत आहे मात्र पूर्वीप्रमाणे यंत्रमाग व्यवसाय सुरु व्हायला अजून किमान बारा ते पंधरा दिवसांचा कालावधी जाईल अशी प्रतिक्रिया भिवंडीतील यंत्रमाग व्यावसायिक भूषण रोकडे यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : जगभरात 150 हून अधिक कोरोना लसींवर संशोधन, जाणून घ्या लस विकसित करण्याची पद्धत

...म्हणून कंगना राणौतला दिली ‘Y’ दर्जाची सुरक्षा, मोदी सरकारने सांगितलं खरं कारण

CoronaVirus News : लढ्याला यश! स्वदेशी लसीची प्राण्यांवर यशस्वी चाचणी, भारत बायोटेकची घोषणा 

"शिवसैनिकांनीच मारहाण केली, राष्ट्रपती राजवट लागू करा", 'त्या' अधिकाऱ्याच्या मुलीची मागणी

"उद्धव ठाकरेंनी अयोध्येला येऊ नये नाहीतर..."; कंगनाच्या समर्थनार्थ मुख्यमंत्र्यांना धमकी

टॅग्स :bhiwandiभिवंडीcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस