- सदानंद नाईक
उल्हासनगर : शासनाच्या नियमाचे उल्लंघन करून कॅम्प नं-४ परिसरात शिकवणी वर्ग चालविण्याचा भांडाफोड करून कारवाई करण्याची मागणी समाजसेवक प्रशांत चंदनशिवे यांनी केली. शिकवणी वर्गातील मुलांसह शिक्षक विनामास्क असल्याने, कोरोना संसर्ग होण्याची शक्यता यावेळी व्यक्त केली.
उल्हासनगरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण संख्या वाढल्याने, शासनाने कडक निर्बंध लागू केले. अत्यावश्यक सेवे व्यतिरिक्त दुकाने, शाळा, महाविद्यालय, शिकवणी वर्ग बंद केले. या नियमाचे उल्लंघन करून कॅम्प नं-४ गुरुनानक शाळेजवळील एक शिकवणी वर्ग सुरू होता. याबाबतची माहिती समाजसेवक प्रशांत चंदनशिवे यांना मिळाल्यावर, त्यांनी शिकवणी वर्ग बंद करण्यास सांगितले.
तसेच, याबाबतची माहिती प्रभाग समिती क्रं-४ च्या सहायक आयुक्तांना दिली. शिकवणी वर्गातील मुले व शिक्षक विना मास्क असल्याने, त्यांना कोरोना संसर्गाची शक्यता त्यांनी व्यक्त केली. समाजसेवक प्रशांत चंदनशिव यांच्यासह नियाझ अन्सारी, प्रवीण करीरा, प्रवीण दळवी आदीजन उपस्थित होते.