लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील एका महिला पोलीस निरीक्षकासह आणखी दहा पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे सोमवारी बाधीत पोलिसांची संख्या ६५३ इतकी झाली आहे.शनिवारी केवळ ४८ तासांमध्ये तब्बल ५० पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यापाठोपाठ ५ जुलै रोजीच्या अहवालानुसार शांतीनगरच्या महिला पोलीस निरीक्षक तसेच मुख्यालयातील चौघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. याशिवाय, निजामपुरा, विष्णुनगर, परिवहन शाखा, श्रीनगर आणि बदलापूर पूर्व येथील प्रत्येकी एका पोलीस कर्मचाºयाला लागण झाली. त्यामुळे ६४ अधिकारी आणि ५८९ कर्मचारी असे ६५३ पोलीस बाधित झाले आहेत. तर ४६ अधिकाऱ्यांसह ३९२ कर्मचारी अशा ४३८ पोलिसांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली असून चौघांना यामध्ये आपला जीव गमवावा लागला आहे.
Coronavirus News: ठाणे आयुक्तालयात महिला अधिकाऱ्यासह आणखी दहा पोलीस कोरोनामुळे बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2020 11:47 PM
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयामध्ये सोमवारी काहीसा दिलासा मिळाला. गेल्या २४ तासांमध्ये दहा जणांना लागण कोरोनाची लागण झाली. रविवारी २६ पोलिसांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. सोमवारी त्या तुलनेत कमी पोलीस बाधित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली
ठळक मुद्देआतापर्यंत ६५३ पोलीस झाले बाधित४३८ पोलिसांनी केली कोरोनावर मात