ठाणे : ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील तब्बल २१ वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. दुसरीकडे यातीलच एका वैद्यकीय अधिकाºयाच्या संपर्कात आल्याने महापालिका मुख्यालयातील आरोग्य विभागातील दोन वैद्यकीय अधिकाºयांसह अन्य तिघांना लागण झाली आहे. त्यामुळे कोरोनाशी लढा देणारा हा विभागच आता सील केला असून त्यांच्या संपर्कातील ३५ वैद्यकीय अधिकारी, कर्मचाºयांनाही होम क्वारंटाइन केले आहे.काही दिवसांपूर्वी कळवा रुग्णालयातील चार ते पाच जणांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर आता हा आकडा थेट २१ वर पोहोचला आहे. यामध्ये ८ ते १० वैद्यकीय अधिकाºयांचाही समावेश आहे. उर्वरित वैद्यकीय कर्मचाºयांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे येथील तीन ते चार विभाग सध्या सील केल्याची माहिती डॉ. आर.टी. केंद्रे यांनी दिली.कळवा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी मीटिंगसाठी पालिका मुख्यालयात येत होते. त्यांना बाधा झाल्यानंतर, त्यांच्या संपर्कात आलेले आरोग्य विभागातील दोन वैद्यकीय अधिकारी आणि अन्य तीन कर्मचाºयांनाही बाधा झाली. त्यांच्या संपर्कातील इतर २५ जणांना होम क्वारंटाइन करून चौथ्या मजल्यावरील आरोग्य विभाग सील केल्याची माहिती डॉ. आर.टी. केंद्रे यांनी दिली.
CoronaVirus News in Thane : रुग्णालयाच्या २१, पालिकेच्या पाच कर्मचाऱ्यांना कोरोना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 12:54 AM