शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
2
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
3
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
4
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
5
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
6
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
7
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
8
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
9
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
10
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
11
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
12
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
13
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
14
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
15
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
16
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
17
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
18
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
19
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
20
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का

CoronaVirus News in Thane : कोरोनाबाधित रुग्णाचा रस्त्यावरच तडफडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 3:38 AM

CoronaVirus News in Marathi and Live Updates : या ६० वर्षीय व्यक्तीला ताप येत होता. त्यामुळे त्याची सोमवारी कोरोना चाचणी करण्यात आली. त्यानंतर मंगळवारी त्याला जास्त त्रास होऊ लागल्याने त्याच्या मुलीने त्यांना कळवा रुग्णालयात नेले.

ठाणे : ठाण्यातील वागळे इस्टेटच्या शिवाजीनगर भागात एका ६० वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा रस्त्यावर तडफडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. रुग्णवाहिका त्याला घेण्यासाठी आली. मात्र, सोबत डॉक्टर वा वैद्यकीय कर्मचारी नव्हते. त्यामुळे पीपीई किटअभावी त्याला रुग्णवाहिकेत टाकण्यास कोणीही पुढे सरसावले नाही.या ६० वर्षीय व्यक्तीला ताप येत होता. त्यामुळे त्याची सोमवारी कोरोना चाचणी करण्यात आली. त्यानंतर मंगळवारी त्याला जास्त त्रास होऊ लागल्याने त्याच्या मुलीने त्यांना कळवा रुग्णालयात नेले. मात्र, जागा नसल्याचे सांगून आणि तापाचा रुग्ण दाखल करून घेत नसल्याचे कारण पुढे करून त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यास सांगितले. परंतु, तेथेही त्याला उपचारासाठी दाखल करून घेतले नाही. तापाच्या रुग्णाला आम्ही दाखल करून घेत नाही, आधी रिपोर्ट आणा मगच दाखल करतो, असे त्यांना सांगण्यात आले.अखेर त्या मुलीने आपल्या पित्याला पुन्हा घरी नेले. त्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास त्याला जास्तीचा त्रास होऊ लागला. त्यानंतर त्या मुलीने तेथील माजी स्थानिक नगरसेवकाला सांगून रुग्णवाहिका मागविली. तीदेखील चारच्या सुमारास दाखल झाली. तेव्हाच त्याचा रिपोर्टही आला. त्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते.परंतु, रुग्णवाहिकेत चालकाशिवाय डॉक्टर किंवा इतर कोणताही स्टाफ आला नव्हता. दोन तासांचा कालावधी निघून गेला आणि त्यातच त्या व्यक्तीचा तेथेच मृत्यू झाला.मदतीसाठी कोणी नाही, बघ्यांची गर्दीपरिसरातील सुमारे १०० ते १५० नागरिक त्या रुग्णाची होणारी तडफड पाहत होते. त्याचा अहवाल हा पॉझिटिव्ह आल्याने कोणीही पुढे जाण्यास तयार होत नव्हता. बघ्यांनी गर्दी केली होती. तो तडफडत होता, त्याला खूप त्रास होत होता. परंतु, पीपीई किट नसल्याने कोणीही पुढे जाण्यास धजावत नव्हता. या घटनेला जबाबदार कोण असा सवाल मात्र या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

टॅग्स :thaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस