ठाणे/ कल्याण : लॉकडाउनमुळे करण्यात आलेल्या नाकाबंदीच्या ठिकाणी पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून १४ शिक्षक नव्याने मिळालेली जबाबदारी पार पाडत आहेत. अगदी पोलिसांसारखी खाकी वर्दी परिधान करून उन्हातान्हात वाहनांची तपासणी करीत आहेत.देशात लॉकडाउन घोषित केल्यापासून शाळा, महाविद्यालये यांना सुटी लागली आहे. त्यामुळे शिक्षकांना शैक्षणिक काम नाही. परिणामी, अनेक स्थानिक स्वराज्य संस्था तसेच राज्य सरकारच्या विविध विभागांनी शिक्षकांना सर्वेक्षणापासून नाकाबंदीपर्य$ंत विविध कामांकरिता नियुक्त केले आहे.आरएसपीच्या माध्यमातून कल्याण-डोंबिवलीचे समादेशक मनीलाल शिंपी यांच्यासह कैलास पाटील, रामदास भोकनळ, दत्तात्रेय पाटील, दिलीप पवार, महादेव क्षीरसागर, बन्सीलाल महाजन, राजेंद्र गोसावी, केशव मालुंजकर, जितेंद्र सोनवणे, अनंत किणगे, अनिल बोरनारे, योगेश अहिरे, सचिन मालपुरे असा १४ शिक्षकांचा चमू २४ मार्चपासून कल्याणमधील दुर्गाडीनाका, गांधारीनाका आणि शहाड फाटक या ठिकाणी ठाणे पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत काम करीत आहे.>पोलिसांकडून कौतुकशिक्षकांच्या या कामाबद्दल वाहतूक विभागाचे कल्याण वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील आणि वाहतूक उपअधीक्षक निघोट यांनी कौतुक केले. नागरिकांना घरी बसा, असे सांगूनही ते घरात बसत नाहीत. त्यामुळे पोलीस यंत्रणेवर नाहक ताण येतो. नागरिक घरी राहिले तरच कोरोनासोबतची लढाई लवकरात लवकर जिंकता येऊ शकते, असे त्यांनी सांगितले.
CoronaVirus News in Thane: खाकी वर्दीतील शिक्षक करताहेत नाकाबंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2020 1:59 AM