ठाणे: जिल्ह्यात रविवारी २५२ नव्या रुग्णांची नोंद झाल्यामुळे एकूण रुग्णसंख्या ३,६८४ झाली आहे. तर, सात जण दगावल्याने एकूण बळींची संख्या ११२ आहे. रविवारी ठाणे पालिका कार्यक्षेत्रात सर्वाधिक ८८ रुग्ण नोंदवले गेले आहेत. नवीमुंबईत सर्वाधिक पाच जणांचा मृत्यू झाला असून सर्वात कमी एक रुग्ण भिवंडी आणि अंबरनाथ येथे आढळला. बदलापूर येथे रुग्णांच्या संख्येने शतक पूर्ण केले आहे.ठामपामध्ये सापडलेल्या ८८ रुग्णांनी एकूण रुग्णसंख्या एक हजार १७८ झाली आहे. नवीमुंबईत ६२ रुग्णांची नोंद झाल्याने तेथील रुग्णसंख्या एक हजार १९0 झाली आहे. रविवारी पाच जण दगावले असून मृतांचा आकडा ३१ झाला आहे. कल्याण डोंबिवली येथे ४१ नव्या रुग्णांचे निदान झाल्याने एकूण रुग्णसंख्या ५00 झाली आहे. तेथे एक जण दगावला असून मृतांची संख्या ११ वर गेली आहे. १८ नवीन रुग्ण मिराभार्इंदर येथे आढळल्याने तेथील रुग्णसंख्या ३३0 झाली आहे. तेथे एकाचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा १0 झाला आहे. बदलापूरला १६ रुग्णांची नोंद झाली असून तेथील रुग्णसंख्या ११४ झाली आहे. १३ रुग्ण उल्हासनगरमध्ये सापडल्याने तेथील रुग्णसंख्या ११९ झाली आहे. ठाणे ग्रामीणला १२ रुग्ण आढळून आले असून रुग्णसंख्या १७७ वर गेली आहे. सर्वात कमी एक रुग्ण भिवंडी आणि अंबरनाथ येथे नोंदवला गेला आहे. तेथील रुग्णसंख्या अनुक्रमे ४२ आणि ३४ इतकी असल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.
ठाणे जिल्ह्यात तिसऱ्या दिवशी दोनशेहून अधिक रुग्णांची नोंदठाणे: जिल्ह्यात रविवारी २५२ नव्या रुग्णांची नोंद झाल्यामुळे एकूण रुग्णसंख्या ३,६८४ झाली आहे. तर, सात जण दगावल्याने एकूण बळींची संख्या ११२ आहे. रविवारी ठाणे पालिका कार्यक्षेत्रात सर्वाधिक ८८ रुग्ण नोंदवले गेले आहेत. नवीमुंबईत सर्वाधिक पाच जणांचा मृत्यू झाला असून सर्वात कमी एक रुग्ण भिवंडी आणि अंबरनाथ येथे आढळला. बदलापूर येथे रुग्णांच्या संख्येने शतक पूर्ण केले आहे.ठामपामध्ये सापडलेल्या ८८ रुग्णांनी एकूण रुग्णसंख्या एक हजार १७८ झाली आहे. नवीमुंबईत ६२ रुग्णांची नोंद झाल्याने तेथील रुग्णसंख्या एक हजार १९0 झाली आहे. रविवारी पाच जण दगावले असून मृतांचा आकडा ३१ झाला आहे. कल्याण डोंबिवली येथे ४१ नव्या रुग्णांचे निदान झाल्याने एकूण रुग्णसंख्या ५00 झाली आहे. तेथे एक जण दगावला असून मृतांची संख्या ११ वर गेली आहे. १८ नवीन रुग्ण मिराभार्इंदर येथे आढळल्याने तेथील रुग्णसंख्या ३३0 झाली आहे. तेथे एकाचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा १0 झाला आहे. बदलापूरला १६ रुग्णांची नोंद झाली असून तेथील रुग्णसंख्या ११४ झाली आहे. १३ रुग्ण उल्हासनगरमध्ये सापडल्याने तेथील रुग्णसंख्या ११९ झाली आहे. ठाणे ग्रामीणला १२ रुग्ण आढळून आले असून रुग्णसंख्या १७७ वर गेली आहे. सर्वात कमी एक रुग्ण भिवंडी आणि अंबरनाथ येथे नोंदवला गेला आहे. तेथील रुग्णसंख्या अनुक्रमे ४२ आणि ३४ इतकी असल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.