ठाणे : जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत मंगळवारीही पाच हजार ९५७ रुग्णांची वाढ झाली आहे. तर १८ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आता तीन लाख लाख ४९ हजार ९८७ रुग्णांची नोंद झाली. तर जिल्ह्यातील मृतांची संख्या सहा हजार ५९९ नोंदण्यात आली आहे. ठाणे शहरात एक हजर ८८३ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता ८७ हजार २८९ झाली आहे. शहरात चौघांचा मृत्यू झाल्यामुळे मृत्यूची संख्या एक हजार ४७५ झाली. कल्याण - डोंबिवलीत एक हजार ३०९ रुग्णांची वाढ झाली असून एक मृत्यू आहे. आता ८६ हजार ८०६ रुग्ण बाधीत असून एक हजार २५७ मृत्यूची नोंंद आहे.
उल्हासनगरमध्ये २६० रुग्ण सापडले असून एक मृत्यू आहे. येथील बाधितांची संख्या १४ हजार ९९१ झाली. तर, ३८३ मृतांची नोंद झाली आहे. भिवंडीला ७९ बाधीतसह एकही मृत्यू नाही. आता बाधीत आठ हजार २२५ असून मृतांची संख्या ३६५ आहे. मीरा भाईंदरमध्ये ४१४ रुग्ण आढळले असून एक मृत्यू आहे. या शहरात बाधितांची संख्या ३२ हजार ८५४ असून मृतांची संख्या ८४२ झाली आहे.
अंबरनाथमध्ये ४४७ रुग्ण आढळले असून एकही मृत्यू नाही. येथे बाधीत १२ हजार २१८ असून मृत्यू २० आहेत. बदलापूरमध्ये २३२ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधीत १३ हजार ६५३ झाले आहेत. या शहरात एकही मृत्यू नसल्यामुळे मृत्यूची संख्या १२५ कायम आहे. ग्रामीणमध्ये १२१ रुग्णांची वाढ झाली असून तीन मृत्यू आहे. आता बाधीत २१ हजार ५०१ आणि आतापर्यंत ६१६ मृत्यू झाले आहेत.