लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना बुधवारी मुलूंडच्या फोर्टीस रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांच्यासह अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी यांनी त्यांचे पुष्पवृष्टी करीत जल्लोषात स्वागत केले. आतापर्यंत ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात एक हजार ८५ पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे.ताप आणि साधारण खोकला आल्यामुळे फणसळकर यांनी त्यांची कोरोना तपासणी केली होती. त्याचा अहवाल ६ सप्टेंबर रोजी पॉझिटीव्ह आल्यामुळे ते मुलूंडच्या फोर्टीस रुग्णालयात दाखल झाले होते. या रुग्णालयात दहा दिवसांच्या उपचारानंतर प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना १६ सप्टेंबर रोजी दुपारी घरी सोडण्यात आले. एरव्ही, पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रत्येकाच्या प्रकृतीची डॉक्टरांकडून तसेच संबंधित रुग्णालयाकडून आपल्या कर्मचाºयांची माहिती घेत होते. या काळात त्यांना धीर देण्याचे तसेच त्यांचे मनोबल वाढविण्याचे कामही ते फोनद्वारे करीत होते. त्यामुळेच कोरोनाची बरीचशी भीती कमी झाली होती. तरीही, धोका पत्करायचा नव्हता. म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून ते मुलूंडच्या रुग्णालयात दाखल झाले होते. दाखल होतांनाच आपण लवकरच कोरोनावर मात करुन परत येऊ असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला होता. अनेकांच्या सदिच्छा, श्रींच्या कृपेने आणि डॉक्टरांनी केलेल्या योग्य उपचारांमुळे आपल्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्याचे ट्वीट त्यांनी बुधवारी केले. प्रकृती सुधारत आहे. लवकरच संपूर्णपणे बरे होऊन पुनश्च सेवेत रुजू होईल हे सांगतांनाच ठाणेकरांचे मन:पूर्वक आभारही त्यांनी या ट्वीटद्वारे मानले आहेत. रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर सह पोलीस आयुक्त डॉ. सुरेश मेकला, अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रविण पवार, संजय ऐनपुरे, अनिल कुंभारे आणि उपायुक्त बाळासाहेब पाटील आदी अधिका-यांनी त्यांचे स्वागत केले.
Coronavirus News: ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी केली कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 7:59 PM
ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना बुधवारी मुलूंडच्या फोर्टीस रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांच्यासह अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी यांनी त्यांचे पुष्पवृष्टी करीत जल्लोषात स्वागत केले.
ठळक मुद्देलवकरच सेवेत दाखल होणार पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी केले स्वागत