- अनिकेत घमंडीडोंबिवली: सुमारे दोन महिन्यांनी शुक्रवारी सकाळी कसारा सीएसएमटी, कर्जत सीएसएमटी आणि कल्याण सीएसएमटी मार्गावर रेल्वे वर्करसाठी विशेष लोकल सोडण्यात आली. मात्र त्या लोकलमध्ये सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचा फज्जा उडाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. कल्याण स्थानकातून सुटणारी पहिली लोकल ही सकाळी 6 वाजून 15 मिनिटांनी ठाकुर्ली स्थानकात आली, तसेच कर्जत येथून सुटलेली लोकल ठाकुर्ली मध्ये सकाळी 8.15 वाजण्याच्या सुमारास आल्याचे सांगण्यात आले.एका लोकलचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्यामध्ये रेल्वे वर्करने मास्क लावला आहे पण सोशल डिस्टंन्सिंग मात्र ठेवलेले नाही. त्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये त्यांबद्दल चर्चा सुरू आहे. प्रवासी एकमेकांजवळ उभे होते, एकमेकांजवळ बसले होते असे चित्र व्हीडीओतून स्पष्ट दिसत आहे.आमचा जीव टांगणीला लागला आहे प्रवास कसा करायचा. आमच्या घरात आई आणि वडील म्हातारे आहेत आणि दोघे ज्येष्ठ नागरिक आहेत.- एक रेल्वे कर्मचारी
कोणत्याही प्रकारे लोकल सेवा सुरू झालेली नाही. श्रमिक गाड्या सोडताना ज्या ठिकाणी रेल्वे कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे तेवढ्याच रेल्वे कर्मचाऱ्यांना सूचित करून बोलवण्याचे नियोजन आहे, त्यानुसार विशेष लोकल चालवण्यात आली असून, त्यात कोणताही सामन्य प्रवाशाचा समावेश नव्हता, केवळ रेल्वेमन विशेष इएमयु रेक चालवण्याचे नियोजन गरजेनुसार असेल.- शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी मध्य रेल्वे