ठाणे : ठाणे महानगरपालिकाक्षेत्रासह मीरा भार्इंदर, नवी मुंबई आणि कल्याण -डोंबिवली पालिकाक्षेत्रात कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत वाढ होताना दिसत आहे. त्सोमवारी ठाण्यात दोघा तर डोंबिवलीत आणखी एका कोरोनाबाधीताचा मृत्यू झाला. सोमवारी ठाणे शहरात ७ मीरा भार्इंदरमध्ये १२, नवी मुंबईत ३ आणि कल्याण - डोंबिवलीत ३ आणि बदलापुरात दोन असे २८ नव्या रु ग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधीतांचा आकडा ४२३ वर पोहोचला आहे.जिल्ह्यात आतापर्यंत १५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दुसरीकडे नवी मुंबईतील एका खाजगी कंपनीतील ४० जणांची चाचणी केली होती. त्यातील सहा जणांचा अहवाल हा पॉझिटीव्ह आला आहे. यातील चार नागरिक हे ठाण्यात वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली आहे.रविवारी ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत एकाच दिवशी १९ नवीन रु ग्णांची नोंद झाली होती. त्यात सोमवारी आणखी सात नव्या रुग्णंची भर पडली. त्यामुळे कोरोनाबाधीतांची संख्या १५५ वर पोहोचली असून आतापर्यंत चौघांचा मृत्यू झाला आहे. तसेच मीरा भार्इंदरमध्ये १२ नवीन रु ग्ण आढळून आल्याने ९४ इतकी संख्या झाली आहे. तर नवी मुंबई पालिका क्षेत्रात तीन नवे रु ग्ण आढळल्याने येथील रु ग्ग्णांची संख्या ६९ झाली आहे. तर, कल्याण डोंबिवली क्षेत्रात तीन नवीन रु ग्णांची नोंद झाल्यामुळे तेथील रु ग्णांचा आकडा ७८ वर पोहोचला आहे. तर डोंबिवलीत सोमवारी कोरोना बाधीत रुग्णाचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे सोमवारी या चार शहरांव्यतिरिक्त बदलापूरमध्ये दोन जणांना कोरोनाची लागण झाली. तर अंबरनाथ, ठाणे ग्रामीण आणि भिवंडी या शहरांमध्ये नव्या रु ग्णाची नोंद करण्यात आली नाही.ठाणे शहरातील करोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत नाही. रविवारी ठाण्यात १९ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर सोमवारी ठाण्यात नवीन ७ रु ग्ण सापडले सापडले आहेत. त्यामुळे शहरातील रु ग्णांचा एकूण आकडा १५५ झाला आहे.‘ते’ ५१ जण विलगीकरण कक्षातसोमवारी टेकडी बंगला परिसरातील ६७ वर्षीय रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे ठाण्यातील मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ४ झाली आहे. लोकमान्यनगर भागातही एका ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्याचा मृतदेह नातेवाईकांकडे सोपविण्यात आला. परंतु, त्याचा मृत्यू हा कोरोनामुळे झाल्याचा अहवाल आता रविवारी प्राप्त झाला आहे.या संदर्भात पालिकेशी संपर्क साधला असता उपायुक्त संदीप माळवी यांनी सदर रुग्ण हा मधुमेह उपचारासांठी कळवा रुग्णालयात दाखल झाल्याचे सांगितले. त्याच्यावर उपचार सुरूअसतांना त्याचा मृत्यू झाला. परंतु, रविवारी त्याचा कोरोना चाचणीचा अहवाल प्राप्त झाला असून तो पॉझिटिव्ह आला आहे. मात्र, त्याने या संदर्भात कोणत्याही स्वरुपाची माहिती रुग्णाने दिली नव्हती. सदर रुग्ण हा केवळ मधुमेहासाठी रुग्णालयात दाखल झाला असल्याचेही त्यांनी सांगितले.दुसरीकडे सदर मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी ५० ते ६० नागरिक सहभागी झाले होते. त्यांचा शोध घेऊन येथील ५१ नागरिकांना घोडबंदर येथील विलगीकरण कक्षात दाखल केले आहे.अत्यावश्यक सेवाही बंदलोकमान्यनगर आणि शास्त्रीनगर या भागातील अत्यावश्यक सेवाही बंद करण्यात आल्या असल्याची माहिती स्थानिक नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी दिली. संबधीत व्यक्ती ही कोणाकोणाच्या संपर्कात आली होती, याचा शोध घेतला जात आहे. त्यासाठी सोमवारी पालिका अधिकाऱ्यांची एक बैठकही घेण्यात आली होती. त्यानुसार रविवारी पर्यंत या भागातील २२ पैकी ११ मेडिकल दुकाने उघडी राहणार असून दुधासाठी सकाळी दोन तासांचा कालावधी दिल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानुसार नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नय, असे आवाहन त्यांनी केले आहे.
CoronaVirus: ठाणे जिल्ह्यातल्या कोरोनाबाधितांची संख्या ४२३; तिघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 2:05 AM