मीरा रोड : कोरानाचा संसर्ग वाढू नये, यासाठी प्रशासकीय पातळीवर जोरदार प्रयत्न सुरू असताना मीरा-भाईंदरमध्ये राजकीय दबावामुळे एकही विलगीकरण (कोरेनटाइन) कक्ष सुरू झालेले नाही. मीरा रोडच्या डेल्टाजवळील स्वतंत्र इमारत यासाठी निश्चित करण्यात आली होती. मात्र, राजकीय दबावामुळे याबाबतचा प्रस्ताव प्रलंबित आहे.मीरा-भार्इंदर शहरात कोणालाही कोरोनाची लागण झालेली नाही. मात्र खबरदारी म्हणून विलगीकरण कक्षासाठी मीरा-भार्इंदर महापालिका व महसूल विभागाने मीरा रोडच्या डेल्टा वसाहतीमागील सरकारी इमारतीची निवड केली आहे.स्वतंत्र असलेली ही इमारत या कक्षासाठी योग्य असल्याने प्रशासनाने निर्णय घेतला. मात्र, भाजप नगरसेवक मोहन म्हात्रे, वीणा भोईर आदीनी काही रहिवाशांसह या कक्षाला विरोध केला आहे.समजावून सांगूनही उपयोग नाहीचडेल्टा वसाहतीमध्ये विलगीकरण कक्ष केल्यास आम्हालाही लागण होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. महापौर ज्योत्सना हसनाळे यांच्या दालनात मंगळवारी विरोध करणारे नगरसेवक आणि नागरिकांची बैठक झाली.यावेळी आयुक्त चंद्रकांत डांगे, उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद पडवळ आदी उपस्थित होते. आयुक्तांसह डॉक्टरांनी महापौर, नगरसेवक तसेच नागरिकांना समजावूनही कोणी ऐकण्यास तयार नव्हते.
Coronavirus : भाईंदरमध्ये विलगीकरण कक्षास विरोध, राजकीय दबाव कारणीभूत असल्याची चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 1:37 AM