ठाणे : जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत तसेच ग्रामीण भागातील कंटेन्मेंट झोनमध्ये मद्य दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत. या आदेशानुसार ठाणे जिल्ह्यातील मनपा, नगरपालिका, नगरपंचायती व ग्रामीण भागातील प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर भागात घाऊक व किरकोळ मद्य विक्रीसाठी सशर्त परवानगी देण्यात आली आहे. तथापि सायंकाळी ५ वाजेनंतर हे व्यवहार सुरू ठेवता येणार नाहीत.संबंधितांना सोशल डिन्स्टसिंग, दर दोन तासांनी निर्जंतुकीकरण, एकावेळी पाच पेक्षा जास्त ग्राहक राहणार नाही याची काळजी घेणे बंधनकारक आहे. सदर परवानगी ही फक्त सिलबंद मद्य विक्रीस आहे. सदर ठिकाणी मद्यपानास परवानगी नाही. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशांचे पालन करणे सर्व विक्रेत्यास बंधनकारक असेल. आदेशाचा भंग केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ नुसार कायदेशीर कारवाई करणौयात येईल.
CoronaVirus : ठाणे जिल्ह्यात सर्व मनपा व प्रतिबंधित क्षेत्रात मद्य दुकाने बंद ठेवण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2020 12:08 PM