मीरारोड - मीरा भार्इंदर मध्ये दिवसभरात १२ कोरोनाचे नविन रुग्ण सापडले असुन एकुण कोरोना रुग्णांची संख्या १०६ झालेली आहे. कोरोना रुग्णांची शंभरी पार झाली असुन अजुनही ८४ जणांचे अहवाल यायचे आहेत. शहरात कोरोनाचे रुग्ण नव नव्या भागात आढळुन येत असल्याने मीरा भार्इंदरकरांनी आता गांभीर्याने घेतले नाही तर कोरोनाचा विळखा अधिक वाढण्याचा धोका व्यक्त होत आहे.पालिकेने आज मंगळवारी रात्री दिलेल्या माहिती नुसार कोरोनाचे १२ नविन रुग्ण दिवसभरात आढळुन आलेले आहेत. नविन आढळलेले रुग्ण हे मीरारोडचे शांती नगर, प्लेझेंट पार्क, एमटीएनएल मार्ग, नया नगर, शांती पार्क तर काशिमीराचे राज इस्टेट समोर येथील आहेत. मीरारोड मध्ये पसरलेले करोनाचे जाळे आता भार्इंदर मध्ये देखील पसरु लागले आहे. भार्इंदरच्या आंबेडकर नगर, भाईंदर फाटक, खारीगाव, शिर्डी नगर, इंद्रलोक फेज ६ या भागात कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत.कोरोना चाचणीचे ८४ जणांचे अहवाल यायचे आहेत. ७० कोेरोना रुग्ण व ४ संशयीतांना भार्इंदरच्या जोशी रुग्णालयात दाखल केले आहे. २४८ जणांना अलगीकरण केंद्रात तर ५५६ जणांना घरीच अलगीकरण करुन ठेवले आहे. दिवसभरात १ कोरोना रुग्ण बरा झाल्याने एकुण ११ रुग्ण आता पर्यंत बरे झाले आहेत. २ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
CoronaVirus मीरा भाईंदरमध्ये कोरोना रुग्णांची शंभरी ओलांडली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 2:38 PM