शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एकाच वाक्यात सांगितलं
3
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
4
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
5
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
6
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
7
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
8
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
9
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
10
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
11
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
13
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
15
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
16
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
17
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
18
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
19
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
20
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका

coronavirus: रिपोर्ट निगेटिव्ह आल्याखेरीज रुग्णाची सुटका होणार नाही, केंद्राचा नियम ठाण्यात बदलला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 2:02 AM

ठाण्यात आठवडाभराचे उपचार घेतलेल्या रुग्णांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याशिवाय आणि विलगीकरणाची व्यवस्था असल्याशिवाय त्याला डिस्चार्ज न देण्याचा निर्णय घेतला आहे.

ठाणे : कोरोनाच्या रुग्णांमध्ये उपचारानंतर लक्षणे दिसत नसल्यास त्यांना विनाचाचणी डिस्चार्ज देऊन सात दिवस होम क्वारंटाइन करण्याचा केंद्र शासनाचा निर्णय ठाणे शहरातील झोपडपट्टी, चाळीत तो रुग्ण पॉझिटिव्ह असल्यास इतरांना कोरोनाची बाधा होण्यास कारणीभूत ठरण्याच्या भीतीने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बदलला. त्यामुळे ठाण्यात आठवडाभराचे उपचार घेतलेल्या रुग्णांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याशिवाय आणि विलगीकरणाची व्यवस्था असल्याशिवाय त्याला डिस्चार्ज न देण्याचा निर्णय घेतला आहे.ठामपा हद्दीतील कोरोनाचा आढावा घेण्यासाठी शिंदे यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. त्यात मृत्यूदर कसा कमी करता येईल, तसेच पाच वर्षांवरील रुग्णांसाठी अभ्यास समिती नेमण्याबाबत चर्चा झाली. पूर्ण बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या समाधानकारक असली तरी लवकरात लवकर रुग्ण बरे व्हावेत यासाठी मनुष्यबळ व रुग्णवाहिकांची संख्या वाढविणे तसेच प्रत्यक्ष काम करणारे डॉक्टर्स, नर्सेस आदींना लागण झाल्यास त्यांच्या उपचाराचा सर्व खर्च महापालिकेतर्फे करण्यात येईल, असे बैठकीत ठरले. महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेत काम करणारे जो कर्मचारी लांबून येत आहेत त्यांची राहण्याची व्यवस्था ठाणे शहरातच केली होती, ती तशीच यापुढे करण्यात येईल, असाही निर्णय घेण्यात आला.भिवंडीत चार नवे रु ग्णभिवंडी शहरात बुधवारी चार नवे रुग्ण आढळले आहेत. तर, शहरातील पाचरु ग्ण बरे झाले आहेत. या रुग्णांमध्ये भंडारी कम्पाउंड येथील महिला, ब्रह्मानंद कामतघरमध्ये १७ वर्षीय तरुणी, सलामतपूरमध्ये वैद्यकीय कर्मचारी महिला आणि कुंभारआळी येथील दोनवर्षीय मुलगी आहे.उल्हासनगरात नवे १९ रुग्ण सापडलेउल्हासनगर महापालिका हद्दीत बुधवारी १९ नवे रुग्ण आढळले. कॅम्प नं-१ गोलमैदान परिसर, तर हॉटस्पॉट ठरलेल्या ब्राह्मणपाडा व सम्राट अशोकनगर आदी ठिकाणी हे रुग्ण आढळल्याने एकूण संख्या ६८ झाली आहे.ब्राह्मणपाडा, सम्राट अशोकनगर व गोलमैदान परिसरात प्रत्येकी २० व १३ कोरोना रु ग्ण सापडले. अद्याप ८९ जणांचा स्वॅब चाचणीचा अहवाल येणे बाकी असून चार दिवसांत ५० रुग्णांची भर पडली.ब्राह्मणपाड्यात राहणाºया पोलीस कर्मचाºयास कोरोनाची लागण झाली. त्याच्या संसर्गामुळे तब्बल १३ जणांना लागण झाली. तसाच प्रकार सम्राट अशोकनगर येथील असून तेथे रु ग्णांची संख्या १५ झाली आहे.कल्याण-डोंबिवलीत दोघांचा मृत्यूकल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत मंगळवारी कोरोनाचे २० नवे रुग्ण आढळले आहेत. तर, दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.त्यापैकी एक कल्याण पश्चिम तर, एक जण डोंबिवली पूर्वेतील आहे. त्यामुळे एकूण मृतांची संख्या सात इतकी झाली आहे. तर, एकूण रुग्णांची संख्या ३८५ झाली आहे.नव्या २० रुग्णांपैकी सहा जण हे डोंबिवली पूर्वेतील, आठ जण कल्याण पूर्वेतील, दोन जण डोंबिवली पश्चिमेतील, दोन जण कल्याण पश्चिमेतील आणि मांडा-टिटवाळा परिसरातील एक जण आहे. या २० रुग्णांमध्ये चार महिला व १६ पुरुष आहेत. आतापर्यंत एकूण उपचार घेत असलेल्या १३० जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडले आहे. तर, सध्या उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या २४८ आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे