ठाणे - मुंबई पाठोपाठ ठाणे शहर पोलीस दलातील श्रीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका 44 वर्षीय महिला पोलीस कॉन्स्टेबलचा गुरुवारी सायंकाळी कोरोनाने मृत्यू झाला आहे. ठाणे पोलीस दलातील ही पहिलीच घटना असून त्यांचा स्वॅबचा रिपोर्ट आल्यानंतर त्यांचा काही तासांनी मृत्यू झाला आहे. त्यांचा मृत्यू त्या कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजल्याने झाला असावा असे बोलले जात आहे.
त्या पोलीस किडनीच्या आजाराने त्रस्त होत्या. 27 मार्चपासून त्या रजेवर होत्या. त्यातच त्या डायलेसिससाठी मुलुंड येथील खाजगी रुग्णालयात जात होत्या. पण तेथे कोरोनाचा रुग्ण सापडल्याने ते रुग्णालयात सील केले गेले होते. त्यामुळे त्यांना 19 मे रोजी डायलेसिससाठी ठाण्यातील एका खाजगी रुग्णालयात नेले होते. त्यांना ताप आल्याने तेथे उपचारार्थ दाखल करून घेतले. 20 मे रोजी त्यांचा स्वॅब घेण्यात आला होता. त्याचा रिपोर्ट गुरुवारी दुपारी आला. त्यामध्ये त्या पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. अशी माहिती पोलिसांनी दिली. त्यांचे पती हे पोलीस दलात होते. त्यांच्या निधनानंतर त्या अनुकंपावर पोलीस दलात भरती झाल्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले असून त्या वागळे इस्टेट येथे वास्तव्यास असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Coronavirus : मुंबई पोलीस दलातील आणखी एका पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू
लॉकडाऊनमध्ये स्पा सेंटरमध्ये अश्लिल चाळे सुरु होते, तितक्यात पोलिसांची धाड पडली अन्...
तरुणीचा खून केला; मृतदेहाचे तुकडे दोन सुटकेसमध्ये भरून जंगलात टाकले