कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेत कोरोनाच्या रुग्णांचा आकडा २००पार गेला आहे. या रुग्णांमध्ये सर्वाधित रुग्ण हे मुंबईत जाणारे अत्यावश्यक सेवेतील सरकारी आणि खासगी कर्मचारी आहेत. त्यामुळे ८ मेपासून या कर्मचाºयांना मुंबईतून कल्याण-डोंबिवली शहरात येण्या-जाण्यास प्रतिबंध करण्यात येत असल्याची माहिती आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.
सरकारी व खाजगी रुग्णालयातील कर्मचारी, तंत्रज्ञ यांच्यासह पोलीस, औषधनिर्माण कंपन्यांतील कामगार मोठ्या संख्येने कल्याण-डोंबिवलीत राहतात. लॉकडाउन लागू झाल्यापासून हे कर्मचारी अत्यावश्यक सेवा देत आहेत. त्यासाठी त्यांना मुंबईत जावे लागते. तेथे यातील कर्मचाºयांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे दोन्ही शहरांतील कोरोनाबाधितांचा आकडा वाढला आहे. या कर्मचाºयांची त्यांच्या कुटुंबासह मुंबईत राहण्याची व्यवस्था करण्यात यावी. तसेच त्यांच्या आरोग्याची तपासणी केली जावी. तसेच, त्यांच्यासाठी कोरोना रुग्णालय सुरू करावे, अशी मागणी मनसेचे आमदार राजू पाटील, कल्याण-डोंबिवली महापालिकेचे स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे आणि आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे यांनी सरकारकडे केली होती. या मागण्यांची दखल घेत सरकारी व खाजगी रुग्णालयात काम करणाºयांची व्यवस्था मुंबईत जवळच्या हॉटेलमध्ये मुंबई महापालिकेतर्फे करण्यात येणार आहे. तसेच, खासगी कंपन्या, बँकांत काम करणाºया कर्मचाºयांनी त्यांची व्यवस्था ते काम करत असलेल्या आस्थापनेच्या नजीक स्वत: करायची आहे.माहिती पाठवण्याचे आवाहननाव, पत्ता, मोबाइल क्रमांक, आधारकार्ड नंबर नमूद करून ही माहिती सरकारी सेवेतील कर्मचाºयांनी kdmc.covid19.gov@gmail.com या ईमेलवर तर खासगी कर्मचाºयांनी kdmc.covid19.pvt@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवण्याचे आवाहन केले आहे.उल्हासनगरातही प्रतिबंधमुंबईत सरकारी आणि खासगी कार्यालयात जाणाºया कर्मचाºयांना ८ मेपासून शहरात ये-जा करण्यास प्रतिबंध घातले आहेत, अशी माहिती पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिली आहे. मुंबई पालिकेत काम करणाºया कर्मचाºयांची निवासाची व्यवस्था पालिकेतर्फे हॉटेलमध्ये केली जाणार असून, खासगी कार्यालयात काम करणाºयांनी त्यांची निवासाची व्यवस्था स्वत: करावी, असेही आयुक्तांनी नमूद केले आहे.