शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

Coronavirus : सार्वजनिक शौचालयांमुळे कोरोनाचा धोका, सावधानता बाळगणे आवश्यक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 1:32 AM

कोरोना संशयितांकडून सुलभ शौचालयांचा वापर होऊन तो सर्वत्र पसरण्याची दाट शक्यता असल्याने वापर करणाऱ्यांचा जीव टांगणीला आहे.

ठाणे : ठाणे महानगरपालिकेने सार्वजनिक आणि सुलभ शौचालयांमध्ये कोरोनाबाबत कोणतीही काळजी घेतली नसल्याने त्यांचा वापर करणाऱ्यांना धोका निर्माण झाला आहे. कोरोना संशयितांकडून त्यांचा वापर होऊन तो सर्वत्र पसरण्याची दाट शक्यता असल्याने वापर करणाऱ्यांचा जीव टांगणीला आहे.सद्य:स्थितीत ठाणे येथे कोरोनाचे रु ग्ण आढळले आहेत. याचा अर्थ असे दाटीवाटीच्या वसाहती, झोपडपट्टी, रेल्वेस्टेशन परिसरात कोरोनाचा जास्त धोका आहे. अशा वेळी या गर्दीच्या ठिकाणी वापरल्या जाणाºया सार्वजनिक शौचालयांचा विविध प्रकारच्या लोकांकडून जास्त प्रमाणात वापर होतो; त्यामुळे अज्ञातपणे एखाद्या कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीकडून अशा शौचालयाचा वापर झाला तर तेथे पसरलेला व्हायरस इतरांना मोठ्या प्रमाणात बाधित करू शकतो.अस्वच्छतेमुळे जास्त धोकाशौचालयांच्या परिसरात नेहमीच घाणीचे साम्राज्य पसरल्याचे दिसते. काही शौचालये ठेकेदारांमार्फत चालविले जातात, काहींचा थेट नागरिकांकडून वापर केला जातो. मात्र, अनेक सुलभ शौचालयांची अवस्थाही इतर सार्वजनिक शौचालयांसारखीच झालेली आहे. त्यामुळे ती कोरोनाचा प्रसार करणारी ठरू शकतात, अशी भीती आहे.दुरुस्तीसाठी नऊ कोटींची तरतूदठाण्यामध्ये सध्या शौचालय दुरुस्तीअंतर्गत एकूण ६५० युनिट व ८,६७० सीट्सचे काम हाती घेण्यात आले आहे. तर २०१९ पर्यंत ४५२ युनिट व ६,०५१ सीट्सच्या दुरु स्तीचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित २०६ युनिट (६१९ सीट्स) मधील काही कामे डिसेंबर २०२० मध्ये आणि काही कामे मार्च २०२१ पर्यंत टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येणार आहेत. शौचालय नूतनीकरण अंतर्गत एकूण २१६ युनिट व २,२५१ सीट्सचे काम हाती घेतले असून, पैकी मार्च २०१९ पर्यंत १,१६४ सीट्सचे बांधकाम पूर्ण केले आहे. उर्वरित काम २०२१ मध्ये करण्यात येणार असून, त्यासाठी नऊ कोटी निधींची तरतूद प्रस्तावित आहे.सार्वजनिक शौचालयांचा अनेक जण वापर करत असतात. यामध्ये संसर्गजन्य आजार असलेल्यांचाही समावेश असतो. तंबाखू, गुटखा, विड्या, सिगारेट, मशेरी यांसारख्या घातक पदार्थांचे सेवन करून काही जण शौचालयातच थुंकतात. काही महिलांकडून मासिक पाळीचे कपडेही टाकले जातात. स्वच्छतेच्या नावाने नेहमीच बोंबाबोंब असते, म्हणूनच येथे संसर्गजन्य आजार पसरत असतात. त्यामुळे ठाणे महापालिका आणि ठेकेदाराने प्रत्येक शौचालयात हात धुण्यासाठी साबण, जंतुनाशक लिक्विड ठेवणे गरजेचे आहे. पाण्याचीही मुबलक व्यवस्था असणे आवश्यक आहे.- जगदीश खैरालीया, समता विचार प्रसारक

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे