शहरं
Join us  
Trending Stories
1
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
2
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
3
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
5
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
6
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
8
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
9
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
10
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
11
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
12
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
13
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
14
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
15
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
16
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
18
RSA vs IND : दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला, टीम इंडिया सेट करणार टार्गेट!
19
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
20
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल

CoronaVirus: ठाणे जिल्ह्यातील ५वी ते ८वीपर्यंतच्या शाळा १५ मार्चपासून बंद, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 7:55 PM

या आदेशाची अंमलबजावणी करण्यास कुणीही टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीताविरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५मधील कलम ५१ ते ६० भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम १८९७ व भारतीय दंड संहिता १८६०मधील कलम १८८ नुसार दंडनीय, कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. (CoronaVirus)

ठाणे: ठाणे जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागात मागील महिन्याभरापासून पुन्हा कोरोनाबाधित (CoronaVirus) रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील पाचही तालुक्यांमधील ५वी ते ८वीपर्यंतच्या सर्व शाळा बंद ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी शिक्षण विभागाला दिल्या आहेत. (CoronaVirus: Schools from 5th to 8th in Thane district closed from March 15)

या आदेशाची अंमलबजावणी करण्यास कुणीही टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीताविरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५मधील कलम ५१ ते ६० भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम १८९७ व भारतीय दंड संहिता १८६०मधील कलम १८८ नुसार दंडनीय, कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारादेखील त्यांनी दिली जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.  ठाणे जिल्ह्यात मागील वर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी टाळेबंदी करण्यात आली होती. या टाळेबंदीमुळे जिल्ह्यातील सहा महापालिकांसह ग्रामीण भागातील शाळादेखील बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यात कालांतराने कोरोना बाधित रुग्णांची संख्या आटोक्यात येत असल्याने टप्याटप्याने टाळेबंदी शिथिल करत २७ जानेवारीपासून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ५वी ते १२वी पर्यंच्या सर्व शाळा महाविद्यालये, आश्रम शाळा सुरू करण्यास मान्यता देण्यात आली होती. मात्र, मागील महिन्याभरापासून पुन्हा कोरोणाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील तसेच शहापूर व मुरबाड नगरपंचायत क्षेत्रातील इयत्ता ५वी ते ८वीच्या वर्गांसाठी, सर्व प्रकारच्या शाळा, आदिवासी विकास विभागाची वसतिगृहे व सर्व आश्रमशाळा, तसेच समाजकल्याण विभागाच्या अधिपत्याखालील सर्व वसतिगृहे व शाळा १५ मार्च पासून पुढील आदेशापर्यंत बंद ठेवणेत याव्यात अशा सूचना जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिल्या आहेत.

याच बरोबर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये व त्यांचे शिक्षण थांबू नये यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ऑनलाईन शिक्षण पूर्ववत चालू ठेवण्यात यावे, असेही नार्वेकर यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रात म्हटले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याthaneठाणेcollectorजिल्हाधिकारीSchoolशाळाStudentविद्यार्थी