उल्हासनगर : शिवसेनेचे नगरसेवक सुनील सुर्वे यांनी कोरोनावर मात करून काही दिवसापूर्वी रूग्णालयातून घरी आले होते. मात्र घरी आल्यानंतर त्यांना श्वसनाचा व इतर त्रास सुरू झाल्याने शहरातील मॅक्स मल्टिप्लेक्स रूग्णालयात रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
उल्हासनगर मराठा सेक्शन विभागातून सलग तीन वेळा निवडून येणारे शिवसेना नगरसेवक सुनील सुर्वे यांना प्रभागातील नागरिकांची मदत करताना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यांच्यावर ठाणे येथील ज्युपिटर रूग्णालयात गेले तीन आठवडे उपचार सुरू होते. कोरोनावर मात केल्यानंतर घरी आले होते. मात्र प्रभागातील कामे करण्यात अग्रेसर असलेल्या सुर्वे यानीची तब्येत बिघडली. त्यांच्यावर शहरातील मॅक्स मल्टीप्लेक्स रूग्णालयात उपचार सुरू असताना रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान मृत्यू झाला. सुर्वे हे किडनी व हृदयविकार आजाराने त्रस्त असून त्यांच्यावर यापूर्वी शस्त्रक्रिया झाली होती. त्यांचे कोरोना संसर्गमुळे नव्हेतर किडनी विकारामुळे मुळे मुत्यू झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. शिवसेनेचा कट्टर शिवसैनिक व नेता गमावल्याची प्रतिक्रिया शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिली. त्यांच्या पश्चात आई पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, बहीण अशा मोठा परिवार आहे.