शहरं
Join us  
Trending Stories
1
काही नाराजी असेल तर उघडपणे व्यक्त करू; संजय शिरसाट यांचे वक्तव्य चर्चेत!
2
“लाडकी बहीण योजना नाही, ‘ती’ ७६ लाख मते महायुतीच्या विजयाची शिल्पकार”; संजय राऊतांचा दावा
3
"अपमान सहन केला जाणार नाही"; किरीट सोमय्यांची भाई जगतापांविरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार
4
IND vs PAK मॅचमधील भारतीय कॅप्टन अन् युधजीत यांनी घेतलेला मस्त रिले कॅच एकदा बघाच (VIDEO)
5
२०० रुपयांसाठी देशासोबत विश्वासघात! पाकिस्तानी गुप्तहेराला माहिती पुरवणाऱ्या मजुराला गुजरातमधून अटक
6
ICC Champions Trophy 2025 : जर हट्ट सोडला नाही तर PCB ला बसेल मोठा फटका; BCCI च्या मनासारखं होणार?
7
₹१८० वर जाणार TATA चा 'हा' शेअर, आताही २२% स्वस्त; LIC कडे आहेत ९५ कोटी शेअर्स 
8
Video - कष्टाचं फळ! मजूर झाला डॉक्टर; दिवसा रोजंदारीवर काम अन् रात्री खूप अभ्यास
9
शेकडोंचा जमाव, घोषणाबाजी, दगड-विटांचा मारा, बांगलादेशात तीन मंदिरांची तोडफोड
10
शुक्र-चंद्र योग: १० राशींना झटपट लाभ, विशेष कृपा; सुख-समृद्धी वृद्धी, पद-पैसा-प्रतिष्ठा लाभ!
11
विधानसभेच्या मतदानाआधीच काँग्रेसला लागली होती पराभवाची कुणकूण? तो अंतर्गत सर्व्हे चर्चेत
12
स्पष्ट बहुमत मिळूनही सरकार न बनणं हे महाराष्ट्रासाठी अशोभनीय; शरद पवारांची टीका
13
तरुणाला वारंवार भेटायची विवाहित महिला, मुलाच्या आईने खडसावताच संतापली आणि...
14
वर्षभरात दिलाय ३३ टक्क्यांपर्यंत रिटर्न, कोणत्या Mutual Fund नं दिले बेस्ट रिटर्न्स, कोणती आहेत सेक्टर्स?
15
स्वप्नील जोशीने दिली 'मुंबई पुणे मुंबई ४' ची हिंट? मुक्ता बर्वेला टॅग करत म्हणाला...
16
Kalki Koechlin : "मी पैशासाठी अनेक गोष्टी..."; २ वर्षे काम नाही; वडापाव खाऊन अभिनेत्रीने काढले दिवस
17
"१०४ वर्षांचा झालोय, मला आता सोडा"; हत्या प्रकरणातील दोषीच्या याचिकेवर कोर्टाने दिला निर्णय
18
अरे बापरे! "कशाला लाज वाटायची?" म्हणत २४ वर्षीय मुलीने ५० वर्षांच्या वडिलांशी केलं लग्न
19
किंग कोहली अन् रुटपेक्षाही फास्टर ठरला Kane Williamson; जाणून घ्या त्याचा खास रेकॉर्ड
20
"आमच्याकडे हिंदू सुरक्षित, भारतातच अल्पसंख्यांकावर..."; बांगलादेशने प्रत्युत्तर देताना लावले आरोप

coronavirus: धक्कादायक! रुग्णवाहिकाचालक, आशांना वेतन नाही, डायलेसिस रुग्णांचीही परवड  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 4:04 AM

ठाणे महापालिकेच्या सेवेते कार्डियाक रुग्णवाहिका चालविणारे २६ चालक आहेत. त्यांना गेल्या पाच महिन्यांपासून वेतनच मिळालेले नाही. तर सुमारे २०० पेक्षा अधिक आशा स्वयंसेविका या कोरोनाबाधीत क्षेत्रामध्ये सर्वेक्षणाचे काम करीत आहेत. त्यांना अवघे १५०० रुपयांचे मानधन देण्यात येते.

ठाणे : कोरोनाच्या महामारीमध्ये प्रत्येक आरोग्यसेवक जीवावर उदार होऊन काम करीत आहे. मात्र, या आरोग्यसेवकांना त्यांचा मेहनतानाच ठाणे महानगरपालिकेकडून देण्यात आलेला नाही. त्यामध्ये कार्डियाक रुग्णवाहिका चालवणारे चालक आणि आशा स्वयंसेविकांचाही समावेश असल्याची बाब माजी विरोधी पक्षनेते तथा ज्येष्ठ नगरसेवक मिलींद पाटील यांनी उघडकीस आणली आहे. विशेष म्हणजे, पाटील यांनी महापालिका आयुक्त आणि आरोग्य अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणूनही जैसे थे परिस्थिती आहे.ठाणे महापालिकेच्या सेवेते कार्डियाक रुग्णवाहिका चालविणारे २६ चालक आहेत. त्यांना गेल्या पाच महिन्यांपासून वेतनच मिळालेले नाही. तर सुमारे २०० पेक्षा अधिक आशा स्वयंसेविका या कोरोनाबाधीत क्षेत्रामध्ये सर्वेक्षणाचे काम करीत आहेत. त्यांना अवघे १५०० रुपयांचे मानधन देण्यात येते. मात्र, तेही जानेवारी महिन्यापासून देण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांची उपासमार होत आहे. ही बाब आपण महापालिका आयुक्तांना फोनद्वारे कळविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांनी फोन न घेतल्याने मेसेज करून याची माहिती दिली आहे. तसेच, मुख्य आरोग्य अधिकारी माळगावकर यांनाही ही बाब सांगितली आहे. मात्र, त्यांनी कोणत्याही प्रकारची दखलच घेतलेली नाही, असेही पाटील यांनी सांगितले.डायलेसिस केंद्र उद्घाटनाअभावी बंदसर्वात महत्त्वाचे म्हणजे ठाणे महापालिकेचा हलगर्जीपणा डायलेसिसच्या रुग्णांच्या जीवावर बेतण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या अनेक रुग्णालये कोविड-१९ साठी अधिग्रहित केलेली आहेत. त्यामुळे डायलेसिससाठी रुग्णांना धावपळ करावी लागत आहे. विशेष म्हणजे, महापालिकेच्या वाडिया रुग्णालयात डायलेसिसची संपूर्ण यंत्रणा १० महिन्यांपासून उभी आहे. मात्र, उद्घाटन न झाल्याने तिचा वापरच करण्यात येत नाही; ही बाब संबंधितांच्या लक्षात आणून दिल्यानंतरही कारवाई होत नसल्याने अशा अधिकाऱ्यांना आता घरी बसवण्याची वेळ आली आहे, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे