शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

coronavirus : कोरोनाविरोधातील लढ्याकरिता श्रीकांत शिंदे यांनी खासदार निधीतून दिले ५० लाख रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 2:14 PM

सर्व लोकप्रतिनीधींनी आणि नागरिकांनी एकजुटीने कोरोना विरोधातील लढ्यात राज्य सरकारसोबत राहून आपापल्या परीने या कार्यात सहभाग घ्यावा

कल्याण - कोरोना विषाणुचा संसर्ग देशात तसेच राज्यातही दिवसेंदिवस वाढत असून कोरोनाच्या संसर्गामुळे बाधित नागरिक राज्यात अनेक ठिकाणी रुग्णालयात उपचार घेत आहेत. राज्यातील अनेक शहरात कोरोना (COVID19) वायरसचा शिरकाव झाला असून राज्यासह ठाणे जिल्ह्यातही कोरोना बाधित रूग्णांचा तसेच कोरोना बाधित नागरिकांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना आकडा वाढतच चालला आहे. कोरोना विषाणू (COVID19) विरोधात सक्षमपणे लढताना राज्याचे मा.मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे साहेब जातीने लक्ष देत या विषाणुचा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता युध्दपातळीवर कार्यरत रहात वेळोवेळी अनेक महत्वपूर्ण उपाय योजना राबवत आहेत, असे कल्याण लोकसभा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

परंतु अचानक आलेल्या या कोरोना संकटाशी दोन हात करताना राज्य सरकारवर याचा मोठ्या प्रमाणावर आर्थिक भार पडत आहे. कोरोनाची तपासणी करण्याकरिता लागणारे  संरक्षणात्मक किट, N-95 सह विविध प्रकारचे मास्क, थरमल इमेजिंग स्कॅनर अथवा कॅमेरा, इन्फ्रा रेड थरमामिटर यांसारखी अनेक वैद्यकिय उपकरणे आणि साधने याबरोबरच कोरोना संसर्ग वाढू नये, यासाठी राज्यभरात संक्रमित व्यक्तिच्या संपर्कात आलेल्या नागरिकांच्या विलगकरणासाठी करण्यात आलेली राहण्याची, जेवण आणि इतर अत्यावश्यक सेवांसाठीची व्यवस्था यांसह अनेक अनेक बाबीं राज्य सरकार करत असताना याचा सरकारी तिजोरीवर खुप मोठ्या प्रमाणावर ताण पडत आहे. यासाठी हातभार म्हणून खारीचा वाटा उचलत कल्याण लोकसभा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी म्हणून लोकप्रतिनीधी या नात्याने कोरोना विरोधातील लढ्याकरिता आपल्या खासदार निधीतून रु.५० लाखांचा निधी मा. ठाणे जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपुर्द केला आहे, असे कल्याण लोकसभा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे स्पष्ट केले.

आपण सर्वांनी एकजुटीने या कोरोना विरोधातील लढ्यात राज्य सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत आपापल्या परीने सहभाग घ्यावा, असे आवाहन ही त्यांनी सर्व पक्षीय खासदार, आमदार, नगरसेवक. जिल्हा परिषद सदस्य आणि लोकप्रतिनीधी तसेच नागरिकांना यावेळी केले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसShrikant Shindeश्रीकांत शिंदेkalyanकल्याण