मीरारोड - भाईंदर मधील स्टील उद्योग हा देशभरात प्रसिद्ध आहे . वर्षी कोरोना संसर्गाच्या लॉकडाऊन नंतर पुन्हा हळूहळू रुळावर येऊ पहात होता . परंतु महाराष्ट्रा सह देशात कोरोनाने पुन्हा कहर माजवल्याने स्टील उद्योगावर अवलंबून असलेले व्यावसायिक व कामगार पुन्हा चिंतेत सापडले आहेत .
भाईंदर मधील स्टील उद्योग हा देशातील सर्वात मोठा स्टील उद्योग म्हणून ओळखला जात होता . परंतु मुंबईला लागून असल्याने वाढत्या शहरीकरणासह स्टील उद्योगाच्या वसाहतीं कडे पालिका व राजकारण्यांसह लोकप्रतिनिधींनी सातत्याने दुर्लक्ष चालवले . जेणे करून अनेक उद्योजक हे वसई व त्या पुढे थेट गुजरात पर्यंत स्थलांतरित झाले .
भाईंदर मध्ये स्टीलची पासून त्याचे बफिंग पोलीस करणे व त्याची घाऊक विक्री करणारे असे सुमारे ३ हजार व्यावसायिक आहेत . ह्या स्टील व्यवसायात काम करणारे सुमारे २५ हजार कामगार आहेत . येथून देशभरात जाणाऱ्या स्टील भांड्यांच्या विक्री व्यवसायावर सुद्धा हजारो व्यापारी व कामगार अवलंबून आहेत .
गेल्यावर्षी कोरोनाच्या संसर्ग काळात स्टील उद्योग सुद्धा अडचणीत सापडला . लॉकडाऊन काळात व्यापाऱ्यांनी त्यांच्या कडील कामगारांना आपापल्या परीने त्यांना शक्य तेवढा पगार दिला . त्यांना गावी जाण्यासाठी पैसे दिले . सप्टेंबर पासून पुन्हा व्यवसाय सुरु झाल्या नंतर कामगारांना परत आणण्यासाठी सुद्धा पैसे दिले .
कोरोना संसर्गाने स्टील व्यवसाय सुद्धा आर्थिक संकटात आणला . परंतु स्टील व्यापाऱ्यांनी आला व्यवसाय पुन्हा रुळावर आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले . हळूहळू तो रुळावर येत होता . लॉकडाऊन काळातले नुकसान भरून निघाले नसले तरी व्यवसाय पुन्हा सावरू लागला होता .
भाड्याने होते किंवा ज्यांच्या डोक्यावर कर्ज होते ते जास्त अडचणीत आले . दिलेल्या मालाची उधारी वसूल करणे सुद्धा अवघड झाले . ज्यांचे होते त्यांना काहीसा दिलासा होता . पण व्यवसाय पूर्वपदावर येईल असे वाटत असताना पुन्हा कोरोनाने डोके वर काढल्याने व्यावसायिक चिंतीत आहेत . त्यांच्या पेक्षा जास्त चिंता रोजगार जाण्याच्या भीतीने कामगारांना सतावत आहे .
कोरोनाचा संसर्ग वाढल्याने पुन्हा निर्बंध आले आहेत . स्टील भांडी घेणारे देशभरातील व्यापारी सुद्धा लॉकडाउनच्या भीतीने माल उचलायला तयार नाहीत . तर माल दिल्यास त्याचे पैसे अडकले तर काय करायचे ? अशी चिंता उत्पादकांसह संबंधितांना लागली आहे . महाराष्ट्र शासनाने सरसकट लॉकडाऊन न करता सोमवार ते शुक्रवार व्यवसाय सुरु ठेऊन शनिवार आणि रविवार लॉकडाउनचा निर्णय घेतला तो स्वागताहार्य असल्याचे स्टील संघटनेचे राजेंद्र मित्तल म्हणाले .
ReplyReply allForward |