बदलापूर - राज्य शासनाने लागू केलेल्या लॉक डाऊन आणखीन कडक करण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर बदलापूर पालिकेने घेतला आहे. आमदारांसोबत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत मेडिकल स्टोअर आणि रुग्णालय सेवा वगळता सर्व अत्यावश्यक सेवा देखील आठवडाभर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (strict lockdown in Badlapur, will shut down all essential services except medical and hospital)एकीकडे राज्य शासन नागरिकांना कमीत कमी त्रास होईल त्या अनुषंगाने लॉक डाऊन मध्ये शिथीलता आणत नवनवीन प्रयोग करीत आहे. तर दुसरीकडे बदलापूरातून कोरोना हद्दपार करण्याच्या उद्देशाने पालिका प्रशासनाने शहरात कडक लॉक डाऊन जाहीर करण्याच्या अनुषंगाने प्रयत्न सुरू केले आहेत. येत्या शनिवारपासून पुढचे सात दिवस शहरात कडक लॉकडावून जाहीर करीत नागरिकांना घरातच राहण्याचा सल्ला प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. या कडक लॉकडाऊन मध्ये मेडिकल स्टोअर आणि दवाखाने वगळता सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने देखील बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.जिल्हा प्रशासनाकडून कोणतीही परवानगी नसताना पालिका प्रशासनाने हा ठोस निर्णय घेण्याचा धाडस केला आहे. मात्र पालिकेच्या या निर्णयाला जिल्हाधिकारी मान्यता देतात की नाही हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. शहर पातळीवर लॉकडाऊन जाहीर करणं हे काळाची गरज असल्याचे मत आमदार किसन कथोरे यांनी व्यक्त केले आहे. एक आठवडा सर्व नागरिकांनी घरी बसून कोरोनाशी लढा दिल्यास कोरोनाची साखळी तोडण्यात यश मिळेल असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला. शहर पातळीवर पोलिसांच्या मदतीने कडक लॉकडाउन करण्याशिवाय पर्याय नसल्याचे मत मुख्याधिकारी दीपक पुजारी यांनी व्यक्त केले आहे.या लोक डाऊन मध्ये भाजीपाला दूध मास आणि मच्छी किराणामाल ही दुकाने देखील बंद राहणार आहे. त्यामुळे आठवडाभर नागरिकांची प्रचंड गैरसोय होणार हे निश्चित मानले जात आहे.
Coronavirus: बदलापूरच्या कडक लॉकडाऊनमध्ये मेडिकल आणि रुग्णालय वगळता सर्व अत्यावश्यक सेवा बंद राहणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2021 11:39 PM