ठाणे : दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांच्या मानात भीतीचे वातवरण निर्माण होत आहे. त्यात कोरोना आजार झाल्यावर रुग्णांच्या मनात विविध प्रश्नाचा काहूर माजत असतो. मात्र, या आजारातून बरे झाल्यानंतर देखील रुग्णांच्या मनात माझ्यामुळे घरातील इतर सदस्यांना याची लागण तर होणारा नाही ना? यासह असंख्य प्रश्नांनी मनात संशयकल्लोळ निर्माण होत आहे. त्यामुळे या आजाराचा धसका घेतल्याने अनेक रुग्णांचे समुपदेशन करून त्यांच्यावर औषधोपचार करण्यात येत आहे.
कोरोना आजार झाला म्हंटला की, अनेकांच्या अंगावर काटा उभा राहतो, तर अनेक रुग्णांमध्ये भीतीचे वातवरण निर्माण होत आहे. त्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधीतांची वाढती संख्या त्यात या आजारावर मात करीत त्यातून बरे होणाऱ्यांची संख्या देखील अधिक आहे. तसेच कोरोना आजार झाल्याचे रुग्णांना समजताच त्यांच्या मनात या आजाराबाबत एक वेगळी भावना निर्माण होते.आपल्याला कोरोना झाला म्हणजे आपले सर्व संपले, आपण या अज्रातून वाचू की नाही असे अस्रेक प्रश्नांची मनात गर्दी होण्यास सुरुवात होते. कालांतराने रुग्ण मानसिक आजाराचे शिकार होत असतात. त्यामुळे अशा रुग्णांचे समुपदेश करून त्यांच्यात सकारात्मक उर्जा निर्माण करण्याचे काम ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाचे मान्सोचार तज्ञ डॉ. समीक्षा पोळ आणि डॉ,जिनी पटनी या दोघी करत आहे.
जिल्हा रुग्णालयात दाखल होणाºया रुग्णांचे समुपदेश करण्याबरोबरच त्यांच्या मनावरील ताण कमी करण्यासाठी योगा, प्रार्थना उपक्रम सकाळच्या सत्रात राबवले जातात. त्यामुळे कोरोनाबाधितांच्या मनातील आजाराबाबत असलेल्या शंकांचे निरसन होते. असे असतांनाही या आजारातून बरे झालेले व घरी गेलेल्या रुग्णांच्या मनात मात्र संशयकल्लोळ निर्माण होत असल्याची बाब समोर आली आहे.ठाण्यात राहणाºया एका महिलेने कोरोनावर यशस्वी मात करीत स्वगृही परतली. मात्र, घरी गेल्यानंतर माझ्यामुळे घरातील इतर सदस्यांना याची लागण तर होणारा नाही ना? यासह असंख्य प्रश्नांनी गर्दी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी डॉ समीक्षा पोळ यांनी त्या महिलेचे समुपदेशन केले. मात्र, त्या महिलेला छाती धडधडणे, झोप न लागणे असा त्रास होऊ लागल्याने तिला औषधोपचार करण्याची वेळी आली.एका ५५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या इसमानेदेखील कोरोनावर मात करीत घर गाठल्यानंतर त्यांच्या मनातदेखील असेच असंख्य प्रश्न निर्माण होऊ लागले. तसेच मी घरात काय काळजी घेऊ, काय करायला पाहिजे, असे प्रश्न त्यांच्यासमोर उभे ठाकले होते. त्यांचेदेखील समुपदेशन करण्यात आले. या व आदी घटनांमुळे कोरोनाची लागण झाल्यानंतर जितका प्रश्नांचा भडिमार होत असतो. त्याहून अधिक धसका हा या आजारातून बरे झाल्यानंतरही रुग्ण घेत असल्याचे दिसून येत आहे.