- पंकज पाटीलअंबरनाथ : हातात कोरोना चाचणीचा अहवाल नसल्याने एका शिक्षकाला जीव गमवावा लागला आहे. चाचणीचा अहवाल न आल्यामुळे या शिक्षकाला उपचारांसाठी रुग्णालयाच्या पायऱ्या झिजवायला लागल्या. अखेर,अखेर चाचणीचा अहवाल आल्यावर त्याला पालिकेच्या रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, तोपर्यंत २उपचारांना विलंब होऊ न त्याची प्रकृती गंभीर बनली होती. पालिकेने त्याला लागलीच ठाण्याच्या मध्यवर्ती रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला; मात्र वाटेतच या शिक्षकाचा मृत्यू झाला.कोरोनाच्या भीतीने अनेक रुग्ण आजही अंगावर त्रास काढत आहेत. त्यांची प्रकृती बिघडल्यावर काय परिस्थिती उद्भवते हे अंबरनाथमधील या शिक्षकाच्या मृत्यूनंतर अनुभवास आले. शिवाजीनगर परिसरात राहणाºया या शिक्षकाला चार ते पाच दिवसांपासून श्वसनाचा त्रास होत होता. त्याने पालिकेत कोरोनाची चाचणीही केली. मात्र, अहवाल येण्याआधीच त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना अंबरनाथच्या खाजगी रुग्णालयात हलवण्याचा प्रयत्न करण्यात आला. कोणत्याच रुग्णालयाने त्यांना दाखल न केल्याने शेवटी डोंबिवलीच्या एम्स रुग्णालयात हलवले. तेथे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर अंबरनाथच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.आॅक्सिजन लेव्हल कमीउपचार सुरू असतानाच त्या शिक्षकाची प्रकृती बिघडल्याने आणि शरीरातील आॅक्सिजन लेव्हल कमी झाल्याने त्यांना ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात हलवण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र, रुग्णालयात दाखल होण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला.
Coronavirus : उपचाराअभावी शिक्षकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2020 12:48 AM