ठाणे : जिल्ह्यात मंगळवारी रुग्णांनी शंभराचा आकडा पार केला. या ११७ नव्या बाधितांमुळे जिल्ह्याची एकूण रुग्ण संख्या एक हजार ३९७ झाली आहे. मंगळवारी नवी मुंबईत सर्वाधिक ४७ रुग्ण आढळल्याने रूग्णसंख्या ३९४ झालीे. तर अंबरनाथ येथे नवीन रुग्ण आढळलेला नाही. परंतु, ग्रामीण भागाची रुग्ण संख्या ५० वर पोहोचली आहे. त्यातच मीरा भार्इंदरमध्ये एका बाधित रुग्णाचा तसेच ठाण्यात दोन, नवी मुंबईत एकाचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील मृतांचा आकडा ३८ वर गेला आहे.
जिल्ह्यात मंगळवारी एकाच दिवशी ११५ नवे रुग्ण सापडण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच वेळ आहे. ठाणे महापालिका हद्दीत ४० रुग्ण आढळून आल्याने तेथील एकूण रुग्ण संख्या ४५१ वर पोहोचली आहे. तर कल्याण डोंबिवलीत ही ११ रुग्ण सापडल्याने एकूण रुग्ण संख्या ही २२४ झाली. मीरा भार्इंदरमध्ये ८ रुग्ण आढळल्याने संख्या १८९ झाली आहे. बदलापूर येथे ५ नव्या रुग्णांमुळे एकूण संख्या ४२ झाली आहे. तर मीरा भार्इंदरमध्ये एकाच्या मृत्यू नोंद आहे. त्याचबरोबर, ठाणे ग्रामीण भागात तीन रुग्ण सापडल्याने संख्या ५० वर पोहोचली आहे. उल्हासनगरमध्ये २ रुग्ण आढळल्याने तेथे १६ रुग्ण आहेत. तर भिवंडीत एका रुग्णाची नोंद झाल्याने येथील संख्या २० झाली आहे. तसेच एक ही रुग्ण न सापडणाऱ्या अंबरनाथची रुग्ण संख्या ११ झाली.
वसई-विरारमध्ये पाच पॉझिटिव्हवसई : वसई, नालासोपारा व विरारमध्ये मंगळवारी पाच नवे रुग्ण आढळले. यामुळे आता बाधितांची संख्या १५८ झाली. पालिका हद्दीत आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला. ७० जणांवर उपचार सुरू आहेत.२१ जणांना लागणवर्तकनगर येथील एका खाजगी कंपनीतील २१ जणांना लागण झाली आहे. काही दिवसांपूर्वीच या कंपनीमधील तिघांना लागण झाली होती. त्यानंतर काहींना क्वारंटाइन करून त्यांची चाचणी केल्यानंतर यातील २१ जण पॉझिटिव्ह निघाले.