हुसेन मेमन
जव्हार -जव्हार तालुक्यातुन शुक्रवार ते रविवार पर्यंत 101 रुग्णांचे स्वाबचे नमुने तीन टप्प्यात पाठविण्यात आले होते, त्यातील सर्वच अहवाल प्राप्त झाले असून, यात 34 पॉझिटिव्ह तर 67 निगेटिव्ह अहवाल गुरुवार पर्यंत प्राप्त झाले, तसेच नव्याने 83 स्वाबचे नमुने पाठविण्यात आले होते, त्यातील 42 अहवाल प्राप्त झाले असून ते सर्वच निगेटिव्ह असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून मिळाली आहे.
दरम्यान तालुक्यात पूर्वीचे 11 पॉझिटिव्ह व या आठवड्यातील 34 असे आजतागायत 45 रुग्ण संख्या झाले असून, यातील 3 रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे. तसेच यांच्या संपर्कातील 83 स्वाबचे नमुने तपासणी साठी पाठविण्यात आले असून सायंकाळी 7 वाजेपर्यंत 42 अहवाल प्राप्त झाले असून हे सर्वच अहवाल निगेटिव्ह आले आहेत. मात्र पॉझिटिव्ह सर्व रूग्णांना कोरोनाची कुठलीच लक्षणे नाहीत, त्यामुळे चिंतेचे बाब नाही.