शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

coronavirus: ठाणे जिल्ह्यामध्ये शनिवार ठरला आंदोलनाचा, भरपावसातही उत्साह

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2020 1:23 AM

मंदिरे सुरू करण्यासाठी सरकार ठोस पाऊल उचलत नसल्याने भाजपने शनिवारी मंदिरांबाहेर घंटानाद आंदोलन करून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. त्यामुळे राज्यातील मंदिरे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, सरकारने मिशन बिगेनअंतर्गत मॉल सुरू करण्याचा निर्णय घेतला, मात्र मंदिरे सुरू करण्यासाठी सरकार ठोस पाऊल उचलत नसल्याने भाजपने शनिवारी मंदिरांबाहेर घंटानाद आंदोलन करून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला. सकाळपासून पावसानेही हजेरी लावली असूनही कार्यकर्त्यांचा उत्साह तसूभरही कमी झाला नव्हता. तसेच जेईई, नीट परीक्षा रद्द करण्यासाठीही राष्ट्रवादीने आंदोलन केले.ठाणे - राज्यातील मंदिरे, गुरुद्वारा, जैन मंदिरांसह धार्मिक संस्था उघडण्याच्या मागणीसाठी भाजपने शनिवारी केलेल्या घंटानादाने ठाणे शहर दुमदुमले. ठाण्यातील प्रमुख देवस्थान कौपिनेश्वर मंदिर परिसराबरोबरच शहराच्या विविध भागांतील २८ मंदिरांबाहेर भाजप कार्यकर्ते, आध्यात्मिक आघाडीसह भाविकांनी दार उघड उद्धवा, दार उघड अशा घोषणांचा गजर करून घंटानाद केला.भाजपचे जिल्हाध्यक्ष व आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर यांनी ठाण्यातील आंदोलनाचे नेतृत्व केले. कौपिनेश्वर मंदिराबाहेरील आंदोलनाला नगरसेवक संदीप लेले, सुनेश जोशी, नम्रता कोळी आदींचीही उपस्थिती होती.महापालिकेतील गटनेते संजय वाघुले यांच्या नेतृत्वाखाली गावदेवीमाता मंदिरासमोर टाळ वाजवून घंटानाद केला. यावेळी प्रशांत कळंबटे, अमित पेडणेकर, विनय राऊत आदींसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. हिरानंदानी इस्टेट येथील श्री सिद्धिविनायक मंदिराबाहेर नगरसेवक मनोहर डुंबरे यांच्या नेतृत्वाखाली नगरसेविका कमल चौधरी, सुरेश पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी घंटानाद केला. चंदनवाडी येथील सिद्धिविनायक मंदिर व राम मंदिराबाहेर झालेल्या आंदोलनांत ज्येष्ठ नगरसेवक अशोक राऊळ, नारायण पवार, भाऊ दामले, संतोष साळुंखे, किशोर गुणीजन, रूपेश कारंडे, भरत पडवळ, महेश विनेरकर आदींचा सहभाग होता. लोकपुरम मंदिराबाहेर नगरसेवक मुकेश मोकाशी, स्रेहा आंब्रे, रमेश आंब्रे, संतोष जैस्वाल यांनी आंदोलन केले. ठाणे शहरातील २८ ठिकाणी आंदोलने करण्यात आली.भाजपच्या नौपाडा मंडल समितीत ५, मध्य मंडल व कळवा मंडल भागात प्रत्येकी ४, घोडबंदर रोड व दिवा भागात प्रत्येकी ३, लोकमान्यनगर, वर्तकनगर व रायलादेवी भागात २, मुंब्रा, कोपरी आणि वागळे इस्टेट भागात एका ठिकाणी टाळांच्या गजराबरोबरच घोषणांमध्ये घंटानाद करण्यात आला. यावेळी पोलीस बंदोबस्त ठेवला होता.‘भावनांशी खेळू नका’उल्हासनगर : शहरातील मंदिरे, सिंधी धार्मिक देवस्थाने उघडण्यासाठी भाजपने घंटानाद केला. आमदार कुमार आयलानी, शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी, नगरसेवक प्रदीप रामचंदानी, मनोज लासी, प्रकाश माखिजा आदी सहभागी झाले होते. झुलेलाल, चालिया मंदिर, मोहटादेवी, हनुमान मंदिर येथे घंटानाद केला. केंद्र सरकारच्या निर्देशानंतरही मंदिरे न उघडता भाविकांच्या भावनांशी खेळले जात असल्याची टीका आमदार आयलानी यांनी केली. भाविकांसाठी सोशल डिस्टन्सिंग पाळून मंदिर सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी यावेळी केली.‘सरकारकडूनच विलंब’अंबरनाथ : शहरातील विविध भागांतील मंदिरांसमोर भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नागरिकांसह घंटानाद केला. राज्यात मद्य, मॉल सुरू करण्यास सरकारकडून परवानगी दिली जाते, मग मंदिरांची दारे उघडण्यासाठी सरकार विलंब का लावत आहे, असा सवाल भाजपचे शहराध्यक्ष अभिजित करंजुले यांनी केला. त्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. सरचिटणीस दिलीप कणसे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष खानजी धल, विश्वास निंबाळकर, भगवान सोलंकी, दीपक कोतेकर, संतोष शिंदे, श्रीकांत रेड्डी, महिला मोर्चा आघाडीच्या मंजू धल, उज्ज्वला कबरे, कृष्णाबा सिसोदिया, शिवशंकर रेड्डी आदी उपस्थित होते.निद्रिस्त सरकार जागे व्हा, देवालये सुरु कराडोंबिवली : भाजपच्या आध्यात्मिक प्रकोष्ठतर्फे देवालये दर्शनाकरिता उघडण्याच्या मागणीसाठी शनिवारी डोंबिवली, कल्याण, टिटवाळा तसेच २७ गावांमध्ये पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व आमदार रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली घंटानाद आंदोलन करण्यात आले. त्याचा प्रारंभ शहरातील श्री गणेश मंदिर संस्थान येथे झाला.मंदिरे उघडावीत, अशी नागरिकांची भावना असून, भाजप तीच मांडत आहे. लॉकडाऊन देशभरात शिथिल झालेले असताना राज्य सरकार मात्र निद्रिस्त असल्याचे सोंग घेत आहे. त्यामुळे झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी हे घंटानाद आंदोलन केले आहे. २३ मार्चपासून लॉकडाऊन झाल्याने गुढीपाडव्यापासून गणेशोत्सवापर्यंत सर्व सण, उत्सव, व्रतवैकल्ये घरातून तसेच साधपणे झाली. पण, आता पुरे झाले. राज्य सरकारने आता देवालये सुरू करावीत, यासाठी हे आंदोलन केल्याचे ते पुढे म्हणाले. ठाणे जिल्ह्यात ७० तर, संपूर्ण कोकण भागात ७०० ठिकाणी हे आंदोलन झाल्याची माहिती चव्हाण यांनी दिली.डोंबिवलीतील आंदोलनप्रसंगी केडीएमसीतील विरोधी पक्षनेते व गणेश मंदिर संस्थानचे अध्यक्ष राहुल दामले, विश्वस्त अच्युत कºहाडकर, नगरसेविका खुशबू चौधरी, मुकुंद पेडणेकर, शशिकांत कांबळे, नंदू जोशी, सचिन कटके आदींसह कार्यकर्ते भाविक उपस्थित होते.दरम्यान, कल्याणमध्येही आमदार गणपत गायकवाड, माजी आमदार नरेंद्र पवार, टिटवाळा येथे माजी उपमहापौर उपेक्षा भोईर, २७ गावांमध्ये माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर, मनीषा राणे यांच्यातर्फे घंटानाद आंदोलने केली.भरपावसात आरती, आंदोलनेकल्याण-डोंबिवलीत शनिवारीही पावसाचा जोर होता. त्यामुळे अनेक ठिकाणी भरपावसात भाजपने घंटानाद आंदोलने केली. तसेच गणपतीची आरती म्हटली. दरम्यान पाऊस, आरोग्याची काळजी घेऊन तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळून हे आंदोलन करावे, असे आवाहन चव्हाण यांनी केले होते. 

टॅग्स :BJPभाजपाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस