ठाणे: जिल्ह्यात शनिवारी एकाच दिवशी सर्वाधिक 97 नवे रुग्ण सापडले आहेत. यामुळे रुग्ण संख्या ही एक हजार 109 इतकी झाली आहे. तर दोघांच्या मृत्यूच्या नोंदीने आतापर्यंत जिल्ह्यात 31 जण कोरोनाचे बळी ठरले आहेत. तसेच शनिवारी सर्वात जास्त 39 रुग्ण नवीमुंबईत आढळून आले असून उल्हासनगरमध्ये एकही नवा रुग्ण मिळून आलेला नाही.
गुरुवार आणि शुक्रवारी जिल्ह्यात 70 च्या पुढेच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली होती. ती संख्या शनिवारी थेट 97 वर जाऊन थांबली. यामध्ये नवीमुंबईत 39 रुग्ण मिळून आल्याने तेथील रुग्ण संख्या 289 इतकी जिल्ह्यातील दोन नंबरची संख्या ठरली आहे. ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात 28 रुग्ण आढळून आल्यामुळे येथील रुग्ण संख्या 372 झाली असून जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण संख्या असलेली ठामपा एक नंबरवर आहे. कल्याण डोंबिवली येथे 12 रुग्ण सापडल्याने एकूण रुग्ण संख्या 181 झाली आहे. बदलापूरला 5 रुग्ण मिळून आल्याने तेथील रुग्ण संख्या 35 झाली आहे. मिराभाईंदर आणि ठाणे ग्रामीण येथे शनिवारी प्रत्येकी 4 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे तेथील एकूण रुग्ण संख्या अनुक्रमे 165 आणि 31 वर पोहोचली आहे. भिवंडीत 3 रुग्ण सापडल्याने तेथील रुग्ण संख्या 16 इतकी आहे. अंबरनाथ येथे 2 रुग्ण मिळून आल्याने तेथील रुग्ण दहा झाली असून उल्हासनगर येथे एक ही रुग्ण न सापडता तेथील रुग्ण दहा इतकीच आहे.
आणखी दोघे दगावलेशनिवारी ही दोन जण कोरोनाच्या प्रादुर्भाव झाल्याने दगावले आहेत. यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत मृतांची संख्या ही 31 वर पोहोचली असून शनिवारी ठामपा आणि ठाणे ग्रामीण येथे प्रत्येकी एक जण दगावल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
अन्य महत्वाच्या बातम्या...
जनधन खात्यांमध्ये 4 मेपासून पैसे जमा होणार; पण काढण्यासाठी अनोखा नियम
IFSC केंद्र नेमके आहे तरी काय? गिफ्ट सिटीचा मालक कोण? जाणून घ्या...
तबलिगींच्या दानाचे केले गुणगाण; 'त्या' आयएएस अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस
"भारत आणि बंगालदरम्यान काहींना युद्ध हवेय"; ममता बॅनर्जींवर जावडेकरांचा गंभीर आरोप
लॉकडाऊनमध्ये नशेत वेगाने कार घेऊन तरुण बेडरूममध्ये घुसला अन्...