शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
2
टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
3
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
4
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
5
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
6
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
7
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
8
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
9
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
10
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
11
लहामटे विरुद्ध भांगरे... अकोलेतील मतविभागणी कोणाचे पारडे जड करणार? 
12
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
13
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
14
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
15
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
16
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
17
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
18
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
19
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
20
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी

coronavirus: दडी मारलेले नगरसेवक झाले टीकेचे धनी, रबरस्टॅम्प नगरसेविकांनी फिरवली पाठ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 1:52 AM

महिलांकरिता आरक्षण लागू झाल्यावर काही आपल्या कामाने सिद्ध झालेल्या महिला राजकारणात आल्या व यशस्वी नगरसेविका झाल्या. मात्र ज्या पती, भाऊ किंवा दीर यांना उमेदवारी न मिळाल्याने बळेबळे राजकारणात खेचल्या गेल्या होत्या, अशा नगरसेविका गेल्या पाच महिन्यांत लोकांमध्ये दिसल्या नाहीत.

ठाणे : कोरोनाच्या महामारीने ठाण्यात धडक दिल्यानंतर एरव्ही आपल्या केलेल्या अथवा न केलेल्या कामाचे मार्केटिंग करणारे काही नगरसेवक चक्क बिळात लपून बसले. त्यांच्या कार्यालयाला टाळे ठोकलेले होते. नगरसेवकांनी मारलेली ही दडी सोशल मीडियावर टिंगलीचा विषय ठरली होती. अर्थात, त्याचवेळी काही नगरसेवक हे जीवाची पर्वा न करता लोकांच्या मदतीकरिता काम करीत होते व त्यामुळे काहींना कोरोनाची लागणही झाली. बहुतांश नगरसेवक बरे झाले. मात्र, एका नगरसेवकाचा मृत्यू झाला.महिलांकरिता आरक्षण लागू झाल्यावर काही आपल्या कामाने सिद्ध झालेल्या महिला राजकारणात आल्या व यशस्वी नगरसेविका झाल्या. मात्र ज्या पती, भाऊ किंवा दीर यांना उमेदवारी न मिळाल्याने बळेबळे राजकारणात खेचल्या गेल्या होत्या, अशा नगरसेविका गेल्या पाच महिन्यांत लोकांमध्ये दिसल्या नाहीत. घरात बसलेल्या काही नगरसेवक, नगरसेविकांनी आपले फोन डायव्हर्ट केले होते. त्यामुळे नागरिकांनी ‘कुणी आमचा नगरसेवक शोधून देता का?’ अशी टीका सोशल मीडियावर केली. ठाण्यात कोरोनाचा शिरकाव मुख्यत्वे झोपडपट्टी परिसरात प्रथम झाला. हातावर पोट असलेल्या अनेकांवर उपासमारीची वेळ आली. कळव्यातील मुकुंद केणी यांनी लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून गोरगरिबांना मदत केली. घरोघरी किराणा सामान पोहोचवणे, घराजवळ भाजी उपलब्ध करून देणे, रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी स्वत: जाणे, अ‍ॅम्ब्युलन्स उपलब्ध करून देणे आदींसह इतर कामेही त्यांनी केली. परंतु, त्यांनाच कोरोनाची लागण झाली आणि त्यांनी आपले प्राण गमावले. काँग्रेसचे विक्रांत चव्हाण यांनी आपल्या प्रभागातील नागरिकांसाठी आरोग्य शिबिरे, अन्नधान्य उपलब्ध करून देणे, प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या आर्सेनिक अल्बमच्या गोळ्या उपलब्ध करून देणे आदी कामे केली. चव्हाण यांनाही कोरोनाची लागण झाली. परंतु, त्यातून ते बरे झाले आणि पुन्हा लोकसेवेत रुजू झाले. नौपाड्यात भाजपच्या नगरसेविका प्रतिभा मढवी आणि त्यांचे पती राजेश मढवी यांनी या संकटकाळात स्वत: रस्त्यावर उतरून जेवण पुरवले. अनेकांना अन्नधान्य, भाजीपाला उपलब्ध करून दिला. मढवी हे स्वत: डॉक्टर असल्याने त्यांनी आपल्या प्रभागातील नागरिकांची तपासणी केली.आर्सेनिक अल्बमच्या गोळ्यांचे वाटप केले. कळव्यातील राष्ट्रवादीचे नगरसेवक मिलिंद पाटील यांनीही आपल्या जीवाची पर्वा न करता नागरिकांसाठी स्वस्तात एक्सरेची सुविधा उपलब्ध करून दिली. भाजीपाला, फळेवाटप केले. मागेल त्याला मदत दिली. भाजपचे कोपरीतील नगरसेवक भरत चव्हाण यांनीही मदतीचा ओघ सुरू ठेवला होता. त्यांनाही कोरोनाची बाधा झाली होती. वागळे इस्टेट परिसरातील शिवसेनेचे नगरसेवक राम रेपाळे यांनी कोरोनाच्या लढाईत अनेकांना मदतीचा हात पुढे केला.अन्नधान्याचे वाटप, रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध करून देणे, औषधांचे वाटप, आरोग्य शिबिरांचे आयोजन, अ‍ॅण्टीजेन टेस्ट करणे, ताप सर्वेक्षण क्लिनिक सुरू करणे, कम्युनिटी किचनच्या माध्यमातून जेवण उपलब्ध करून देणे आदींसह रुग्णांचे बिल कमी करून देणे, काहींची बिले माफ करून देणे आदींसह इतर महत्त्वाची कामे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी केली.कम्युनिटी किचनमधून पुरवले जेवणशिवसेनेचे नगरसेवक विकास रेपाळे यांनीदेखील जीवाची पर्वा न करता आपल्या प्रभागात सुरुवातीपासूनच कम्युनिटी किचनच्या माध्यमातून जेवण तसेच अन्नधान्य पुरविणे, रक्तदान शिबिरे आयोजित करणे, अशी कामे केली.घोडबंदर भागातील भाजपचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी सलग तीन महिने कम्युनिटी किचन सुरू ठेवले होते.तसेच आरोग्य शिबिरे, अन्नधान्य उपलब्ध करून देणे, तापाच्या रुग्णांचा सर्व्हे करणे, झोपडपट्टी भागात जाऊन २० हजार नागरिकांच्या अ‍ॅण्टीजेन टेस्ट करणे आदींसह इतर कामे त्यांनी केली.घोडबंदर येथे तीन ते चार नगरसेवक रस्त्यावर : काही नगरसेवकांनी आपल्या आॅफिसला टाळे ठोकल्याचे चित्र कळव्यातील काही भागांत, मुंब्य्रातील काही भागांत दिसले. घोडबंदर भागांत केवळ तीन ते चार नगरसेवक रस्त्यावर फिरून लोकांना मदत करताना दिसत होते. इतर नगरसेवक गायब झाले होते. किसननगर, वागळे, इंदिरानगर, लोकमान्यनगर आदी भागांतील काही नगरसेवक गायब होते.अनेकांकडून मदतीचा हातराष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी आपल्या प्रभागात आरोग्य शिबिरे, अन्नधान्यवाटप, कम्युनिटी किचन आदींसह इतर माध्यमांतून अनेकांना मदतीचा हात पुढे केला.सर्वच पक्षांच्या नगरसेवकांनी आपापल्या पद्धतीने लोकांना दिलासा दिला. अर्थात, सर्वच नगरसेवकांच्या कामांची दखल घेणे जागेच्या मर्यादेमुळे अशक्य असल्याने ही ठळक प्रातिनिधिक उदाहरणे दिली आहेत.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका