शहरं
Join us  
Trending Stories
1
"संजय राऊत, आता शिंग फुटली तर..."; राज ठाकरेंच्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना इशारा
2
Nobel Peace Prize 2024: अण्वस्त्रांविरोधात काम करणाऱ्या संस्थेचा नोबेल शांतता पारितोषिकाने सन्मान
3
हरयाणानंतर महाराष्ट्र जिंकण्यासाठी भाजपाचा खास प्लॅन, या ३० जागांवर देणार विशेष लक्ष, समीकरणं बदलणार? 
4
वक्फ विधेयकावर आता जमियत उलेमा-ए-हिंदचे मत घेणार; राम मंदिराच्या वकिलांनाही जेपीसीच्या बैठकीचे निमंत्रण
5
Harry Brook, PAK vs ENG: "अजून बरीच शतकं ठोकणार..."; पाकिस्तानी गोलंदाजांना 'त्रिशतकवीर' हॅरी ब्रूकने दिला इशारा
6
पॅराग्लायडिंग करत असताना पॅराशूटचा तोल गेला, तरुण खाली कोसळला, पण सुदैवाने वाचले प्राण
7
प्रकाश आंबेडकर यांचे मुख्यमंत्री शिंदेंना पत्र; धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त केली महत्त्वाची मागणी
8
"स्वामींनीच त्याला माझ्यासमोर आणलं", केदार शिंदेंनी सांगितलं सूरज चव्हाणच्या निवडीबद्दल
9
दुसऱ्या प्रेग्नंसीवर व्यक्त झाली आलिया भट; म्हणाली, "भविष्यात सिनेमांसोबतच आणखी..."
10
Noel Tata : रतन टाटांचा उत्तराधिकारी ठरला; कोण आहेत टाटा ट्रस्टचे नवे अध्यक्ष नोएल टाटा?
11
Ratan Tata Successor : टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नोएल टाटा यांची नियुक्ती, संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय
12
Jigra Movie Review: जिगरबाज बहिणीची डेअरिंगबाज कहाणी, आलिया भटचा 'जिगरा' कसा आहे वाचा
13
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल; दिवाळीपूर्वीच सोन्याला पुन्हा झळाळी
14
खामेनेईंना सत्तेवरून हटवण्यासाठी इस्रायलकडून मोहीम, इराणला टारगेट करण्यास मंत्रिमंडळाचा ग्रीन सिग्नल
15
हिंद महासागरात चक्रव्यूह...! भारताची पकड आणखी मजबूत होणार; चीनला देणार टक्कर
16
पाकिस्तानच्या हाती घबाड लागले; सौदीने या गोष्टीसाठी दोन अब्ज डॉलर मोजले...
17
मुलाकडून विरोध तर वडिलांकडून मदतीचं आवाहन, कागलच्या राजकारणात पुन्हा नवा 'ट्विस्ट'!
18
"अजितदादा आणि प्रकाश आंबेडकरांनी एकत्र यावं", राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं विधान
19
शरद पवारांची खेळी उलटणार?; इंदापूरात हर्षवर्धन पाटलांविरोधात स्थानिक नेते एकटवले
20
"आम्हाला शक्य तितक्या लवकर..."; घरच्या मैदानात लाज गेल्यानंतर पाकिस्तानी कर्णधाराचे विधान

CoronaVirus: कोरोना योद्ध्यांना त्रास दिल्यास सोसायट्यांचा पाणीपुरवठा खंडित

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 12:55 AM

कोरोनाने संपविली ठाणेकरांची माणुसकी; अनेक सोसायट्या देत आहेत त्रास

- अजित मांडके ठाणे : कोरोनाशी सामना करण्यासाठी अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांमध्ये केवळ पोलीस, डॉक्टर हेच येत नसून अनेक जण या सेवेत मोडत आहेत. परंतु, ते कामावरून घरी परतल्यावर त्यांना कुठे इमारतीचा दरवाजा बंद असतो, तर कुठे तुम्ही तुमची सोय बाहेर करा, इथे येऊ नका, असे सांगून त्यांना चक्क घराबाहेरच राहण्याचा सल्ला दिला जात आहे. यातूनच आता माणुसकी संपली की काय, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. यावर उपाय म्हणून महापालिकेने अशा सोसायट्यांचा पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला आहे.दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत आहे. या बिकट परिस्थितीत काहीजण तारेवरची कसरत करून अत्यावश्यक सेवा देण्यासाठी सज्ज होत आहेत. अनेकांनी इतरांच्या मदतीसाठी हात पुढे केले आहेत. मात्र, दुसरीकडे कोरोनाच्या भीतीमुळे ठाण्यात अनेक सोसायट्यांमध्ये स्थानिकांनी माणसुकी गहाण टाकल्याची उदाहरणे समोर आली आहेत.ठाण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज शहरात या रुग्णांची संख्या १८० च्या घरात गेली आहे. त्यामुळे हा प्रकोप रोखण्यासाठी पोलीस, पालिका प्रशासन, काही सामाजिक संघटना, नागरिक पुढे येत आहेत. परंतु, हा वेगाने पसरणारा संसर्ग असल्याने सर्वांनीच धसका घेतला आहे. याच कारणामुळे माणुसकीदेखील काहीशी कमी झाल्याचे चित्र ठाण्यातील अनेक सोसायट्यांमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा देणाºया नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे.हे आहेत कोरोना योद्धेअत्यावश्यक सेवा देणाऱ्यांमध्ये केवळ पोलीस किंवा डॉक्टरच येत नाहीत. तर महापालिकेतील सफाई कामगार, फवारणी करणारे, इतर कर्मचारी, अधिकारी, पाणीपुरवठा कर्मचारी, महावितरण कर्मचारी, दूरसंचार, आयटी कर्मचारी, बँक कर्मचारी, प्रसारमाध्यमांतील कर्मचारी वर्गाबरोबर काही खाजगी कंपनीतही सॅनिटायझर तयार करण्याचे काम करीत आहेत़ कोणी मास्क बनविण्याचे काम करीत आहे, तर काही जण समाजालाही आपले काही देणे लागते म्हणून या संकटात अडकलेल्यांसाठी मदतीचा हात पुढे करीत आहेत.असा होत आहे छळएकीकडे हे सर्वजण आपल्या जीवाची पर्वा न करता तारेवरची कसरत करून या संकटात अडकलेल्यांसाठी मदतीचा हात पुढे करीत आहेत. परंतु, यातील अनेकांना आता ते ज्या घरात राहत आहेत, त्या सोसायट्यांची दारे बंद केली जात आहेत.कुठे इमारतीच्या प्रवेशद्वाराला लॉक केले जात आहे, तर कुठे जाणूनबुजून अशांना त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे. काही जण तर कोरोना बरा होत नाही, तोपर्यंत तुमचे कार्य बाहेर राहूनच करा, असे सुनावत आहे. त्यामुळे संकटांचा सामना करून घरी आलेल्यांना आता घरही परके झाल्याचे दिसत आहे.एकीकडे कोरोनाचा सामना करण्यासाठी एकजूट करून प्रशासन काम करीत आहे़ त्यांच्या मदतीला इतर मंडळींदेखील काम करीत असताना त्यांनाच अशा पद्धतीने वागणूक दिली जात असल्याने माणसातील माणुसकी संपली की काय? असा सवाल उपस्थित झाला आहे.ठाण्यातील १४६३ सहकारी संस्थांना नोटिसापोलीस आयुक्तांनी बजावले : कोरोना योद्ध्यांना कोणताही त्रास देऊ नकाठाणे : कोरोनाचा सामना करणाºया योद्ध्यांना गृहनिर्माण संस्था व संकुलातील पदाधिकारी व रहिवाशांनी मानसिक व शारीरिक त्रास देऊ नये, यासाठी ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील १४६३ गृहनिर्माण संस्था आणि गृहसंकुलांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. आयुक्तालयांतर्गत अजूनही काही शिल्लक असलेल्या संस्थांना पोलीस ठाण्यामार्फत पत्रव्यवहार करण्यात येत आहे.अत्यावश्यक सेवा देणारे डॉक्टर, नर्सेस, वैद्यकीय क्षेत्राशी निगडित व्यक्ती, पोलीस, स्वच्छता विभागातील कर्मचारी हे ज्या सहकारी गृहनिर्माण संस्था, संकुलात राहतात, त्या अधिकारी/कर्मचाºयांना कोणत्याही प्रकारे मानसिक व शारीरिक त्रास देण्यात येऊ नये, याबाबत जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, ठाणे यांच्या स्तरावर गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाºयांना ठाणे शहर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी पत्रव्यवहार केला होता. त्यानुसार, आयुक्तालयातील परिमंडळ-१ मध्ये १५२, परिमंडळ-२ मध्ये १५५, परिमंडळ-३ मध्ये ९०६, परिमंडळ-४ मध्ये ८५ आणि परिमंडळ-५ मध्ये १६५ अशा एक हजार ४६३ सहकारी संस्थांना नोटिसा बजावल्या असून या योद्ध्यांना त्रास देऊ नये, असे निर्देश दिले आहेत.आयुक्तालय क्षेत्रात काही ठिकाणी स्थानिक रहिवाशांकडून कोरोनाशी सामना करणाºया योद्ध्यांना गृहनिर्माण संस्थांसह संकुलांतील रहिवाशांकडून वाळीत टाकण्याच्या, मानसिक त्रास देण्याच्या तक्रारी येऊ लागल्या होत्या. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पोलीस आयुक्तांनी या नोटिसा बजावल्या आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका