शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
2
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
3
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
4
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
5
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
6
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
7
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
8
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
9
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
10
Pune Crime: महिलेची हत्या, पोत्यात बांधून झुडपात फेकला मृतदेह; घटना कशी आली उघडकीस?
11
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
12
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
13
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
14
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी
15
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
16
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
17
हलगर्जीपणाचा कळस! प्रसूतीनंतर डॉक्टरांकडून पोटात राहिला 'टॉवेल'; महिलेला प्रचंड वेदना अन्....
18
Perfect Tea Recipe: टपरीवरचा फक्कड चहा बनवा घरच्या घरी; फक्त 'आलं' टाकताना करा 'हा' छोटासा बदल!
19
Vodafone Idea च्या शेअर्समध्ये १७% ची तेजी, सरकारच्या एका निर्णयामुळे गुंतवणूकदारांच्या उड्या
20
HDFC Life Insurance Data Leak : 'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर?

Coronavirus in Thane: एक हजार बेड हॉस्पीटलच्या देणग्या एमसीएचआय, जितो ट्रस्टच्या तिजोरीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 6:44 PM

ठाणे महापालिका आयुक्तांचा अजब निर्णय: नारायण पवार यांची टीका

ठाणे : `कोरोना'च्या काळातील ठाणे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांच्या धक्कादायक निर्णयांची मालिका सुरूच आहे. महापालिकेकडून उभारण्यात येत असलेल्या `ग्लोबल इम्पॅक्ट हब' येथील १००० बेडच्या रुग्णालयासाठी कॉर्पोरेट पर्यावरणीय जबाबदारी (सीईआर) निधीच्या माध्यमातून येणाऱ्या सर्व देणग्या थेट एमसीएचआय आणि जितो ट्रस्टच्या तिजोरीत जमा होणार आहेत. या संदर्भात महापालिकेकडून थेट बिल्डरांना पत्र पाठवून निधी देण्यास सांगण्यात येत आहे. दरम्यान, या निर्णयावर भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी टीका केली असून, सीईआर निधी पुन्हा बिल्डरांच्या खिशात देण्याचा हा प्रकार आहे. रुग्णालय चालविण्यासाठी ठाणे महापालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासन अकार्यक्षम आहे का? असा सवालही त्यांनी केला आहे.

ठाणे महापालिकेचा १००० बेडचे रुग्णालय हा `ड्रीम प्रोजेक्ट' मानला जातो. माजिवडा येथील ग्लोबल इम्पॅक्ट हबमध्ये रुग्णालय उभारले जात असून, त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. या रुग्णालयाची जबाबदारी महापालिकेची असल्याचे मानले जात होते. प्रत्यक्षात सीईआर निधीतून रुग्णालय उभारले जात आहे. महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी २२ मे रोजी आदेश काढून १००० बेडच्या रुग्णालयाची जबाबदारी एमसीएचआय व जितो एज्युकेशन अॅण्ड मेडिकल ट्रस्टकडे सोपविली आहे.

बड्या बिल्डरांच्या प्रकल्पातून सामाजिक कामांसाठी कॉर्पोरेट पर्यावरणीय जबाबदारी (सीईआर) निधी जमा केला जातो. त्यातून सरकार वा महापालिकेला आरोग्यासह विविध कामे करता येतात. त्यानुसार ठाणे महापालिकेने शहरातील बड्या बिल्डरांकडून निधी जमविण्यास सुरूवात केली आहे. ठाणे महापालिकेच्या नगररचना विभागाच्या सहायक संचालकांनी शहरातील बड्या बिल्डरांना पत्रे पाठविली आहेत. त्यात एमसीएचआय, ठाणे आणि जितो ट्रस्टच्या खात्यावर थेट निधी जमा करण्याची सुचना देऊन खात्यांचा सविस्तर तपशील दिला आहे.या प्रकाराला  नगरसेवक पवार यांनी आक्षेप घेतला आहे. सामाजिक कामांसाठी सीईआर निधी अस्तित्वात आला. त्यातून सरकारी यंत्रणेने स्वत: कामे करण्याची अपेक्षा आहे. ठाण्यातील बिल्डर लॉबीने शहराचे किती भले केले, हे सर्व सुजाण ठाणेकर जाणत आहेत. अशा परिस्थितीत बिल्डरांकडून निधी जमा करून, तो बिल्डरांच्या संघटनेलाच वापरण्यास देणे किती संयुक्तीक आहे, असा सवाल पवार यांनी महापालिका प्रशासनाला विचारला आहे. रुग्णालय चालविण्यासाठी ठाणे महापालिकेतील सत्ताधारी व प्रशासन अकार्यक्षम आहे का. महापालिका संबंधित प्रकल्पावर नियंत्रण ठेवणार असल्याचे स्पष्ट केले जात असले, तरी ते प्रत्यक्षात होईल का, असा सवालही त्यांनी केला आहे.  

भरमसाठ दराच्या खरेदीसाठी पळवाट 

कोरोना'च्या आपत्तीत चढया दराने साहित्याच्या खरेदीचा प्रकार महापालिकेत उघडकीस आला होता. त्याच पद्धतीने १००० बेडच्या रुग्णालयासाठी जादा दराने साहित्य घेऊन भ्रष्टाचार करण्याची संधी साधण्यासाठी, रुग्णालयाचे व्यवस्थापन व कारभार एमसीएचआय व जितो ट्रस्टकडे सोपविण्यात आला आहे. त्यांच्याकडून खरेदी केलेल्या वस्तूंचे दर कोण निश्चित करणार.. एका व्यापारी संघटनेच्या माध्यमातून महापालिका सामाजिक हित कसे साधते, ते अनाकलनीय आहे, असा टोलाही पवार यांनी लगावला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका