ठाणे - ठाणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत २४९ कोरोना रुग्णांची वाढ झाली असून आठ जणांचा मृत्यू सोमवारी झाला आहे. ठाण्यात ५९ रुग्णांच्या वाढीसह एक मृत्यू आहे. कल्याण डोंबिवलीला ६८ रुग्ण वाढ झाली असता एकाचा मृत्यू नोंद आहे. नवी मुंबईत ३४ रुग्णांच्या वाढीसह मृत्यू नाही.
उल्हासनगरमध्ये आठ रुग्ण वाढ झाली असून एक मृत्यू आहे. भिवंडीत आज एक रुग्ण आणि मीरा भाईंदरला २५ रुग्णांची वाढ होऊन एकाचा मृत्यू झाला आहे. अंबरनाथला सात रुग्ण वाढले असून एकाचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये नऊ रुग्णांची आज वाढ झाली आहे. तर जिल्ह्यातील गांवपाड्यात ४१ रुग्ण सापडले असून तीन मृत्यूची नोंद आहे.
ठाणे जिल्ह्यात साडे सात वाजेपर्यंत ५० हजार ८८७ नागरिकांचे लसीकरण
कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत ठाणे जिल्ह्यात आज सायंकाळी साडे सातपर्यंत ५० हजार ८८७ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५५ लाख ९९ हजार २३३ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून त्यापैकी ३९ लाख ७३ हजार ७७३ नागरिकांना पहिल्या डोसचे तर १६ लाख २५ हजार ४६० नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. आज दिवसभरात लसीकरणाचे सुमारे २८८ सत्र आयोजित करण्यात आले.