ठाणे - जिल्ह्यात कोरोनाचे ४३२ रुग्ण शनिवारी आढळले असून १८ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात पाच लाख ३० हजार ७२० बाधितांची नोंदली गेली असून मृतांची संख्या दहा हजार ६२९ झाली आहे.
ठाणे शहरात ८६ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता एक लाख ३२ हजार ९४२ झाली. शहरात एक मृत्यू झाल्यामुळे मृत्यूची संख्या दोन हजार तीन नोंदण्यात आली. कल्याण - डोंबिवलीत ९३ रुग्णांची वाढ झाली असून एक मृत्यू झाला आहे. आता एक लाख ३५ हजार ९९४ रुग्ण बाधीत असून दोन हजार ५८७ मृत्यूची नोंद झाली आहे.
उल्हासनगरला सहा रुग्ण सापडले असून दोन मृत्यू झाले. येथील बाधितांची संख्या २० हजार ७४७ झाली. तर, ४९५ मृतांची नोंद आहे. भिवंडीला तीन बाधीत असून एकही मृत्यू नाही. आता बाधीत १० हजार ६०२ असून मृतांची संख्या ४५६ नोंद आहे. मीरा भाईंदरमध्ये ४२ रुग्ण आढळले असून दोन मृत्यू झाले आहेत. या शहरात बाधितांची संख्या ५० हजार ४५८ असून मृतांची संख्या एक हजार ३२८ झाली.
अंबरनाथमध्ये १४ रुग्ण आढळल्याने आता बाधीत १९ हजार ६८१ झाले असून तीन मृत्यू झाले आहे. येथील मृत्यूची संख्या ५१० झाली आहे. बदलापूरमध्ये १४ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधीत २१ हजार १३ झाले आहेत. येथे एकही मृत्यू झालेला नसल्याने मृत्यूची संख्या ३४० आहे. ग्रामीणमध्ये ४९ रुग्णांची वाढ झाली असून तीन मृत्यू झाले. आता बाधीत ३९ हजार ४९ तर आतापर्यंत एक हजार १७६ मृत्यू झाले आहेत.