ठाणे - ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ४७५ ने वाढली असून १३ जणांचा शनिवारी मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आजपर्यंत पाच लाख ३४ हजार ११ रुग्णांची व दहा हजार ७३३ मृतांची नोंद करण्यात आली.
जिल्ह्यातील या रुग्ण संख्येत ठाणे शहरात आढळलेल्या ११४ रुग्ण आढळले. दिवसभरात दोन जणाचा मृत्यू झाला. यासह बाधितांची संख्या एक लाख ३३ हजार ६३९ झाली आहे. तर असून मृतांची संख्या दोन हजार २१७ नोंदली गेली. कल्याण डोंबिवलीत १०४ बाधीतांसह तिघांचा मृत्यू झाल्याचे आज आढळून आले. या शहरात एक लाख ३६ हजार ६४५ बाधितांसह दोन हजार ५९८ मृतांची नोंद झाली.
उल्हासनगरमध्ये सात बाधीत व एक मृत्यू झाल्याचे आढळले. या शहरात २१ हजार ८०७ बाधितांना ५०८ मृतांची नोंद झाली आहे. भिवंडीत चार बाधीत व एकाचा मृत्यू नाही. यामुळे या शहरातील दहा हजार ६२५ बाधितांसह ४५९ मृत्यू नोंद आहे. मीरा भाईंदरला ३८ बाधीत व दोन मृत्यू झाले. या शहरातील ५० हजार ७६५ बांधिता व एक हजार ३४१ मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अंबरनाथमध्ये नऊ बाधीत व एक मृत्यू झाला आहे. यामुळे आता येथील बाधितांची संख्या १९ हजार ७६४ व मृतांची संख्या ५१७ नोंदली आहे. कुळगांव बदलापूर शहरात ३२ बाधीत सापडले. यासह येथील बाधीत २१ हजार १६३ तर मृत्यू ३४७ झाले आहेत. जिल्ह्यातील ग्रामीणमध्ये ५६ बाधीत आणि दोन जणांचा आज मृत्यू झाला. यामुळे या ग्रमीण क्षेत्रात आजपर्यंत ३९ हजार ४८९ बाधितांची व एक हजार १८५ मृतांची नोंद झाली आहे.