ठाणे - ठाणे जिल्ह्यात बुधवारी रुग्ण संख्येत थोडीशी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. बुधवारी दिवसभरात ३८२० नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता ४ लाख ६० हजार ७५ रुग्णांची नोंद झाली. तर दिवसभरात ६५ रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील मृतांची संख्या ७ हजार ४६६ झाली आहे.
ठाणे शहर परिसरात ९७१ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता १ लाख १७ हजार ३७० झाली आहे. शहरात १५ मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या १ हजार ६४७ झाली आहे. तर कल्याण - डोंबिवलीत १०९१ रुग्णांची वाढ झाली असून ९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. नवी मुंबईत ६३४ रुग्णांची वाढ झाली असून ८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. उल्हासनगरमध्ये १४० रुग्ण सापडले असून ४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
भिवंडीत ३९ बाधीत असून शून्य मृत्यूची नोंद आहे. मीरा भाईंदरमध्ये ३७७ रुग्ण आढळले तब्बल ९ जणांच्या मृत्यूची नोंद आहे. अंबरनाथमध्ये १२५ रुग्ण आढळले असून ५ जणांच्या मृत्यूची नोंद आहे. बदलापूरमध्ये १७८ रुग्णांची नोंद झाली असून १० जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. ठाणे ग्रामीणमध्ये २६५ नवे रुग्ण वाढले आहेत. तर ५ जणांच्या मृत्यूची नोंद आहे. आता बाधीत रुग्णसंख्या २६ हजार १०६ झाली असून आतापर्यंत ६८० मृत्यूंची नोंद आहे.