ठाणे : जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची झपाट्याने वाढ होत आहे. गुरुवारी जिल्ह्यात तीन हजार ३१८ रुग्णांची वाढ झाली असून सात जण दगावले आहेत. जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या दोन लाख ९९ हजार ३४१ झाली असून सहा हजार ४२० मृतांची नोंद झाली आहे.
ठाणे शहरात गुरुवारी तब्बल ९३२ रुग्ण सापडले आहेत. या शहरात आतापर्यंत ७१ हजार ९४२ रुग्ण झाले असून गुरुवारी एकही मृत्यू झाला नाही. त्यामुळे मृतांची संख्या एक हजार ४३२ कायम आहे. कल्याण - डोंबिवलीत ९८७ रुग्ण आढळून आले असून चौघांचा मृत्यू झाला आहे. या शहरात आता ७३ हजार ८३९ बाधित असून एक हजार २३७ मृतांची नोंद आहे.
उल्हासनगरला ११६ रुग्ण आढळले असून एकही मृत्यू नाही. आता या शहरात १३ हजार ४५ बाधित असून मृत्यू संख्या ३७६ आहे. भिवंडीला ६० रुग्ण सापडले असून एकही मृत्यू नाही. येथे सात हजार ३०५ बाधितांची, तर ३५६ मृतांची नोंद आहे. मीरा भाईंदरला १९५ रुग्ण सापडले असून एकाचा मृत्यू आहे. या शहरात आता २९ हजार २९३ बाधितांसह ८१५ मृतांची नोंद आहे.
अंबरनाथ शहरात १३५ रुग्ण सापडले असून, एकही मृत्यू नाही. या शहरात आता दहा हजार ३५ बाधितांसह मृतांची संख्या ३१८ आहे. बदलापूरला १३५ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे बाधित रुग्ण ११ हजार ५४६ असून एकही मृत्यू नसल्याने मृत्यू संख्या १२३ वर कायम आहे. जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात ७७ रुग्ण सापडले असून दोन मृत्यूंची नोंद आहे. या गांवपाड्यांत २० हजार ६६० बाधित झाले असून मृत्यू ६०५ झाले आहेत.