ठाणे : जिल्ह्यात कोरोनाचे चार हजार २११ रुग्णांची वाढ रविवार झाली असून ४६ जण दगावले आहेत. आता जिल्ह्यात एकूण रुग्ण संख्या चार लाख ५० हजार ५८७ झाली असून सात हजार २७८ मृतांची नोंद झाली आहे.
ठाणे शहरातही आज तब्बल एक हजार ५४ रुग्ण सापडले असून या शहरात आतापर्यंत एक लाख १४ हजार ९३१ रुग्ण नोंदले आहेत. आज दहा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या एक हजार ६१३ झाली आहे. कल्याण - डोंबिवलीला आज एक हजार ३२६ रुग्ण आढळून आले असून १० मृत्यू आहे. या शहरात आता एक लाख १६ हजार ३७६ बाधीत असून एक हजार ३८५ मृतांची नोंद झाली.
उल्हासनगरला १२४ रुग्ण आढळले असून दोन मृत्यू झाले. या शहरात १८ हजार २८६ आठ बाधीत असून मृत्यू संख्या ४११ नोंदली आहे. भिवंडीला ६२ रुग्ण सापडला असून तीन मृत्यू आहेत. येथे नऊ हजार ४६६ बाधितांची तर, ३८९ मृतांची नोंद केली. मीरा भाईंदरला ४१९ रुग्ण सापडले असून नऊ मृत्यू आहे. या शहरात आता ४१ हजार ३७४ बाधितांसह ९८३ मृतांची संख्या आहे. अंबरनाथ शहरात २५१ रुग्ण सापडले आहे. तर, पाच मृत्यू झाले. या शहरात आता १७ हजार १२१ बाधितांसह मृतांची संख्या ३५६ आहे. बदलापूरला १७९ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे बाधीत रुग्ण १७ हजार ७३० असून एक मृत्यू असल्याने मृत्यूची संख्या १५८ झाली. जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात २५२ रुग्ण सापडले असून तीन मृत्यू आहे. या गांवपाड्यांत २५ हजार २६८ बाधीत झाले असून मृत्यू ६६२ झाली आहे.