कल्याण/अंबरनाथ/उल्हासनगर : ठाणे जिल्ह्याची वेस ओलांडून नोकरीनिमित्त मुंबईकडे जाणारे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, सरकारी व बँक कर्मचारी घराकडे परतत असल्याने जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ-बदलापूर, उल्हासनगर आदी शहरातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचा स्थानिक महापालिका प्रशासनाचा दावा आहे. त्यामुळे मुंबईला नोकरीला जाणाºयांची त्यांच्या त्यांच्या आस्थापनांनी तूर्त तेथेच निवासाची व्यवस्था करावी व या मंडळींनी वेशीवरून परत जावे, असे आदेश महापालिका प्रशासनाने काढले आहेत.
अगोदर सरकारी कार्यालयातील उपस्थिती पाच टक्के होती. सरकारने हळूहळू कर्मचाºयांची उपस्थिती वाढवली. सोमवारपासून तर शंभर टक्के कर्मचाºयांची उपस्थिती असावी, असा आदेश काढला. पोलीस, डॉक्टर, रुग्णालयात काम करणारे कर्मचारी हे अत्यावश्यक सेवेत असल्याने त्यांच्यासाठी ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर येथून बेस्ट, एसटी बसची सोय केली आहे. रोज हजारो कर्मचारी मुंबईत कामाला जातात. मात्र, या कर्मचाºयांमुळेच ते ज्या शहरात राहतात तेथे रुग्ण वाढत असल्याचे स्थानिक प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी या कर्मचाºयांची ते नोकरी करतात तेथेच निवासाची सोय करावी, अशी मागणी केली आहे. कामावर गेले नाही तर सरकार कारवाई करण्याची भीती आणि कामावर गेले तर घरी परत न येण्याचे आदेश यामुळे या कर्मचाºयांबरोबरच त्यांचे कुटुंबही अस्वस्थ झाले आहेत. एकीकडे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाºयांची प्रशंसा होत असताना दुसरीकडे त्यांना घरी येण्यास मज्जाव करणे ही दुटप्पी भूमिका असल्याचे या कर्मचाºयांचे मत आहे.उल्हासनगरात राहणार प्रतिबंधउल्हासनगर : मुंबईत सरकारी आणि खासगी कार्यालयात जाणाºया कर्मचाºयांना ८ मेपासून शहरात ये-जा करण्यास प्रतिबंध घातले आहेत, अशी माहिती पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिली आहे. मुंबई पालिकेत काम करणाºया कर्मचाºयांची निवासाची व्यवस्था पालिकेतर्फे हॉटेलमध्ये केली जाणार असून खासगी कार्यालयात काम करणाºयांनी त्यांची निवासाची व्यवस्था स्वत: करावी, असेही आयुक्तांनी नमूद केले आहे.अंबरनाथ / बदलापूर : मुंबईत काम करणाºया कर्मचाºयांना मुंबईतच राहण्याचे आदेश कल्याण-डोंबिवली महापालिकेप्रमाणेच आता अंबरनाथ पालिकेनेही काढले आहेत. शुक्रवारपासून या आदेशाची अंमलबजावणी होणार आहे. बदलापूर नगरपालिकेनेही असाच निर्णय घेण्याची गरज आहे.
मुंबईत काम करणारे कर्मचारी कोरोनाग्रस्त होत असल्याने त्याचा धोका आता अंबरनाथमधील नागरिकांना होत आहे. शहरासोबत सर्वाधिक धोका हा त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना होत आहे. हीच परिस्थिती बदलापूरच्या बाबतीत झाली आहे. बदलापूरमध्येही मुंबईत काम करणाºया कर्मचाºयांना कोरोनाचा धोका असून त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांमध्येही भीती आहे. बदलापूरमध्येही अनेक रुग्ण हे मुंबईशी संबंधित आहेत. त्यांच्यामुळे निकटवर्तीयांना कोरोनाची लागण झाली.