बदलापूर: ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरात कोरोनाचे तीन रुग्ण आढळले असून त्यांना उपचारासाठी उल्हासनगरच्या कोविड स्पेशल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या तीन रुग्णांमध्ये दोन रुग्ण हे पोलिसाची पत्नी आणि मुलगी असून एक रुग्ण हा खाजगी रुग्णालयात काम करणारा कर्मचारी आहे.
बदलापुरात कोरोनाचे तीन रुग्ण आढळले असून त्यांची कोरोना चाचणीही पॉझिटिव्ह आली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये एका 45 वर्षीय महिलेचा समावेश असून तिच्या वीस वर्षीय मुलीला देखील कोरोनाची लागण झाली आहे. लॉकडाऊन असताना कोल्हापूरला नातेवाईकांच्या अंत्यसंस्कारासाठी गेले असताना ही लागण झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
कोरोना लागण झालेल्या या दोघी एका पोलीस कुटुंबाशी निगडित आहेत. ते बदलापूरच्या कात्रप परिसरात राहणारे आहेत. तर वोकहार्ड रुग्णालयात काम करणाऱ्या एका 28 वर्षे कर्मचाऱ्याला देखील कोरोनाची लागण झाली असून तो पालिकेच्या क्वारंटाइन सेंटरमध्ये दाखल आहे. त्या तिन्ही रुग्णांना उल्हासनगरच्या कोविड स्पेशल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येणार आहे.
दरम्यान, एकाच दिवशी बदलापुरात तीन कोरोनाचे रुग्ण आढळल्याने आता बदलापुरात देखील सतर्कता बाळगण्यात येत आहे.