ठाणे : एका महिला पोलीस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्यानंतर आता ठाणे नियंत्रण कक्षातील आणखी एका पोलीस कर्मचाऱ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मुंब्रा पोलीस ठाण्यातील दोघांनी कोरोनावर मात केली असून अन्य महिला कर्मचाºयासह दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे पोलिसांसाठी काहीसा दिलासा तर काहीसे चिंतेचे वातावरण दिसत आहे.मुंबईत नागपाडा येथील नियुक्तीवरील उपनिरीक्षक ठाण्यात वास्तव्यास आहेत. त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांची ठाणे नियंत्रण कक्षात नियुक्तीवर असलेली उपनिरीक्षक पत्नी, तसेच आई आणि दोन वर्षांची मुलगीही पॉझिटिव्ह आढळली. या चौघांवरही मुंबईतील सेव्हन हिल्स या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेने पोलीस वसाहत आणि नियंत्रण कक्षात काहीसे भीतीचे वातावरण असतानाच शनिवारी नियंत्रण कक्षातील आणखी एका कर्मचाºयाची तपासणीही पॉझिटिव्ह आली. त्यानंतर नौपाड्यातील एक कर्मचारी तर मुंब्रा पोलीस ठाण्यातील एका महिलेसह दोघांना रविवारी लागण झाली. या चौघांनाही रुग्णालयात दाखल केले आहे. आतापर्यंत सहा पोलीस अधिकारी आणि ३३ कर्मचाºयांना कोरोनाची लागण झाली. त्यातील चार अधिकारी आणि १५ कर्मचाºयांनी या आजारावर मात केली आहे.दोन पोलीस अधिकारी आणि १८ कर्मचाºयांवर वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये सद्य:स्थितीत उपचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, मुंब्य्रातील दोघांना भार्इंदरपाडा येथील उपचार केंद्रातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांचे ठाणे पोलिसांनी टाळ्या वाजवून स्वागत केले.
coronavirus: मुंब्य्रातील महिलेसह दोन पोलिसांना कोरोना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 2:34 AM