ठाणे - ठाण्यात सोमवारी आणखी दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ठाण्यातील टेकडी बंगला परिसरातील एकाच 60 वर्षीय व्यक्तीचा तसेच लोकमान्य नगर पाडा नंबर चार या भागातील 40 वर्षीय व्यक्तीचा यात समावेश आहे. त्यामुळे ठाण्यातील मृतांचा आकडा आता चारवर जाऊन पोहोचला आहे.
लोकमान्य नगर पाडा नंबर 4 मध्ये मृत्यू पावलेल्या कोरोनाबाधित रुग्णाचा अहवाल हा मृत्यूनंतर समोर आला आहे. या रुग्णाला निमोनिया झाल्याने त्याला 17 एप्रिल रोजी महापालिकेच्या कळवा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर याच दिवशी त्याची कोरोना चाचणी देखील करण्यात आली होती. परंतु अहवाल येण्यापूर्वीच 18 तारखेला त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने संबंधित रुग्णांचा अहवाल येण्यापूर्वीच त्याचा मृतदेह त्याच्या घरच्यांकडे सुपूर्त केला. त्यानंतर त्याचा 50 ते 60 लोकांच्या उपस्थितीत अंत्यविधी करण्यात आला. आता मात्र त्याचा रिपोर्ट पॉझिटिव आल्याने रुग्णालय प्रशासनना बरोबर महापालिका प्रशासनाची ही झोप उडाली आहे.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सोमवारी सकाळी स्थानिक नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी महापालिका अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यानुसार या व्यक्तीच्या जवळजवळ दोनशेच्या आसपास नागरिक संपर्कात असू शकतील असा अंदाज बांधला जात आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारपासून ते रविवारपर्यंत लोकमान्य नगर आणि शास्त्रीनगर हा संपूर्ण भाग बंद करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. या पट्ट्यात 22 मेडिकल असून त्यातील केवळ 11 मेडिकल उघडे राहणार आहेत. तसेच नागरिकांना दूध घेण्यासाठी सकाळचा दोन तासांचा कालावधी देण्यात आला आहे. या दोन अत्यावश्यक बाबी वगळल्या तर इतर सर्व दुकाने,भाजीपाला मार्केट आधी संपूर्णपणे रविवार पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : चिंताजनक! महाराष्ट्रात 283 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या 4483 वर
Coronavirus : देशातील 'या' झोनमधील नागरिकांना दिलासा! आजपासून कोणकोणत्या सेवा सुरू जाणून घ्या
धक्कादायक! ...अन् पोलिसाने स्वत:च्याच मुलांवर झाडल्या गोळ्या, एकाचा मृत्यू, तीन जण जखमी
Coronavirus : धोका वाढला! देशातील 'या' 10 जिल्ह्यांत कोरोनाचा कहर
Coronavirus : लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडणाऱ्याला पोलिसांनी दिली अनोखी शिक्षा, Video पाहून कराल कौतुक
Coronavirus : कोरोनाची लक्षणे असलेल्या पतीला 4 रुग्णालयांनी नाकारलं, पत्नीने घरीच केले उपचार अन्...