शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
5
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
6
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
7
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
8
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
9
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
10
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
11
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
13
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
14
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
16
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
18
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
19
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
20
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

Coronavirus: ठाणे जिल्ह्यातील महापालिकांना केंद्रीय सचिवांच्या कानपिचक्या; मृत्यूदर कमी करा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2020 2:56 AM

मृत्यूदर कमी कसा करता येईल त्यासाठी काय काय प्रयत्न करणे गरजेचे आहे, याचा विचार करा, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लवकुमार अग्रवाल यांनी सांगितले.

ठाणे : कोरोना रुग्णांची संख्या वाढते यामुळे घाबरू जाऊ नका, मृत्यूदर कसा कमी करता येईल यासाठी प्रयत्न करा तसेच नागरिकांमध्ये जनजागृती करा, कंटेनमेंट झोनची प्रभावीपणे अंमलबाजवणी करा, कोरोना रुग्णांसाठी उभारलेल्या आरोग्य सेवेच्या ठिकाणी आवश्यक तो स्टाफ पुरवा, औषधोपचार वेळेत मिळावा यासाठी प्रयत्न करा, याशिवाय रोजच्या स्क्रीनिंगचे प्रमाण वाढवा अशा कानपिचक्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लवकुमार अग्रवाल यांनी ठाणे जिल्ह्यांतील महापालिकांना पाहणीनंतर झालेल्या बैठकीत दिल्या.

आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्या उपस्थितीत शनिवारी सकाळी अग्रवाल यांच्या अधिपत्याखालील पथकाने ठाणे महापालिका क्षेत्रातील प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी करून त्याची कशा पद्धतीने अंमलबजावणी होते, याची माहिती घेतली. या वेळी त्यांच्यासोबत गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाचे सहसचिव आणि स्मार्ट सिटी मिशन डायरेक्टर कुणाल कुमार, महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा, केंद्रीय संचालक (आरोग्य) डॉ. ई. रवींद्रन आदीं उपस्थित होते.

वयोवृद्धांबरोबर ज्यांना कोरोनाची अधिकची लक्षणे दिसत असतील त्यांना आधी रुग्णालयात बेड उपलब्ध करून द्या, रोजची जी स्क्रीनिंग केली जाते, त्याची संख्या वाढवा, तपासणीची संख्या वाढवा, असेही त्यांनी सांगितले. मृत्यूदर कमी कसा करता येईल त्यासाठी काय काय प्रयत्न करणे गरजेचे आहे, याचा विचार करा, असे सांगितले.कंटेनमेंट झोनमधील निर्बंध कडक कराकोरोनाशी लढा देताना नागरिकांना विश्वासात घ्या, जनजागृती करा, कंटेनमेंट झोनमधील निर्बंध कडक करा, असेही त्यांनी सांगितले. कंटेनमेंट झोनमधून बाहेर जाणे, बाहेरचा नागरिक आत येणे हे फार चुकीचे आहे. त्यामुळे या ठिकाणी नियमांची कठोर अंमलबजावणी करा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचा जे काही आपण करीत आहोत, ते तुमच्यासाठी करीत आहोत, हे त्यांना समजावून सांगा, असेही त्यांनी सांगितले.सर्व महापालिकांचा घेतला आढावापाहणी दौरा झाल्यानंतर केंद्रीय पथकाने महापालिका मुख्यालयामध्ये ठाणे जिल्ह्यातील सर्व महापालिकांचा आढावा घेतला. सुरुवातीस ठाणे महापालिकेचा आढावा घेतल्यानंतर केंद्रीय पथकाने ठाणे जिल्हा, नवी मुंबई, मीरा-भार्इंदर, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर आदी महापालिकांचाही आढावा घेतला. या वेळी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी, मीरा-भार्इंदर महापालिकेचे आयुक्त डॉ. राठोड, उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त दयानिधी, ठाणे पोलीस सहआयुक्त डॉ. मेखला आदी उपस्थित होते.लॅबसोबत समन्वय ठेवाशहरातील लॅबसोबत प्रशासन किंवा आरोग्य यंत्रणेने समन्वय ठेवणे गरजेचे आहे. जेणेकरून रुग्णांची माहिती मिळून त्या रुग्णांना वेळेत उपचार मिळणे शक्य होईल यासाठी प्रयत्न करा. असेही त्यांनी सांगितले.

ठाणे-मुंब्य्रातील कोविड हॉस्पिटलची पाहणीसुरुवातीस या केंद्रीय पथकाने मुंब्रा येथील अमृतनगर, इन्शानगर येथील प्रतिबंधित लोकांची पाहणी करून तेथील नागरिकांशी संवाद साधला. त्यानंतर डॉ. मौलाना अबुल कलाम आझाद स्टेडियम येथे उभारलेल्या कोविड हॉस्पिटलला भेट देऊन डॉक्टरांकडून माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी बाळकूम साकेत येथील एक हजार बेडच्या ठाणे कोविड हॉस्पिटलची पाहणी करून समाधान व्यक्त केले.चाचण्या वाढविण्यावर भर द्या-प्रदीप व्यासराज्याच्या आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी या वेळी क्वारंटाइन सुविधा वाढविणे, मोठ्या प्रमाणात कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे, सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता राखणे, मोठ्या प्रमाणात चाचण्या वाढविणे यावर लक्ष देण्याची आवश्यकता बोलून दाखविली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस