मुंबई : ठाण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने त्याला अटकाव घालण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना आखण्यात येत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचे विलगीकरण करण्यासाठी जागेची आवश्यकता असल्याने संबंधित महाविद्यालयाच्या इमारती ताब्यात घेण्यात आल्या. जनहितासाठीच इमारतींचा ताबा घेण्यात आल्याची माहिती ठाणे महापालिकेने उच्च न्यायालयाला गुरुवारी दिली.उच्च न्यायालयाने ठाणे महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांना व याचिकाकर्ते डॉ. विजय बेडेकर यांना बैठक घेऊन यावर तोडगा काढण्याचा सल्ला दिला. ठाणे पालिकेने आगाऊ नोटीस न देता विद्या प्रसारक मंडळाच्या सात महाविद्यालयांच्या इमारती विलगीकरण केंद्रासाठी ताब्यात घेतल्या. पालिकेच्या या निर्णयाला विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. विजय बेडेकर यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले.‘याचिककर्त्यांनी आरोप केल्याप्रमाणे पालिकेने आठ इमारतींमधील सर्व वर्गांचा ताबा घेतलेला नाही. सहा इमारतींमधील ७३ वर्गांचा ताबा पालिकेने घेतला आहे. मंडळाच्या कोणत्याही मालमत्तेचे नुकसान करणार नाही. दोन इमारती मोकळ्या ठेवण्यात आल्या आहेत. मुळात कोणत्याही महाविद्यालयाचे कामकाज सुरू नव्हते,’ असे पालिकेने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.इमारती ताब्यात घेताना कोणतीही कठोर कारवाई करण्यात आली नाही. जर याचिककर्त्यांच्या कर्मचाऱ्यांना विद्यार्थ्यांचा निकाल लावण्याचे काम करायचे आहे, तर त्यांनी उर्वरित दोन इमारतींमध्ये कामकाज करावे. त्यांच्या कामात अडथळा येणार नाही. महाविद्यालयांची जंगम मालमत्ता त्यांच्या कर्मचाºयांना ताब्यात घेण्यास सांगितले आहे आणि जी मालमत्ता पालिकेच्या ताब्यात आहे त्या मालमत्तेचे नुकसान न होऊ देता जैसे-थे स्थितीत परत करण्यात येईल, असे आश्वासन पालिकेने दिले आहे.त्यावर याचिकाकर्त्यांचे वकील नितीन प्रधान यांनी न्यायालयाला सांगितले की, ६ जुलै रोजी यूजीसीने अंतिम वर्षाच्या परीक्षा सप्टेंबरपर्यंत घेण्यास सांगितले आहे. या इमारती ताब्यात घेतल्याने परीक्षेची तयारी करणे कठीण जाईल.याचिकाकर्त्यांचे आरोप फेटाळले‘याचिककर्त्यांनी आरोप केल्याप्रमाणे पालिकेने आठ इमारतींमधील सर्व वर्गांचा ताबा घेतलेला नाही. सहा इमारतींमधील ७३ वर्गांचा ताबा पालिकेने घेतला आहे. मंडळाच्या कोणत्याही मालमत्तेचे नुकसान करणार नाही. दोन इमारती मोकळ्या ठेवण्यात आल्या आहेत. मुळात कोणत्याही महाविद्यालयाचे कामकाज सुरू नव्हते,’ असे पालिकेने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
coronavirus: "विद्या प्रसारक मंडळ महाविद्यालयाच्या इमारती जनहितासाठीच ताब्यात घेतल्या"
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 2:07 AM